भात कोंड्याच्या तेलाचे फायदे

benefits of rice bran oil
भात कोंड्याच्या तेलाचे फायदे

भात कोंड्याचे राईस ब्रॅन ऑइल काढले जाते. भात कोंड्याचे तेल खूप आरोग्यदायी असते. म्हणून आरोग्याच्या काळजी पोटी भात कोंड्याच्या तेलाचा वापर स्वयंपाक घरामध्ये आजकाल वाढला आहे. त्यामुळे आज आपण भात कोंड्याच्या तेलाचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

  • भात कोंड्याच्या तेलात असणाऱ्या टोकोट्रिएनोल्स ह्या अँटीऑक्सिडंट्समुळे वेगवेगळ्या कॅन्सरपासून रक्षण होण्यास मदत होते.
  • जेव्हा त्वचेला खाज येईल तेव्हा भात कोंड्याचे तेल लावून मालिश केल्याने त्वचेची खाज कमी होण्यास मदत होते.
  • तसेच भात कोंड्याच्या तेलामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास आणि इन्सुलिनचे प्रमाण वाढण्यात मदत होते. डायबेटीस रुग्णांसाठीसुद्धा हे तेल खूप उपयुक्त असते.
  • या तेलामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, तर एचडीएल प्रकाराचे चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. यामुळे वाईट कोलेस्टेरॉलमुळे होणारे हार्ट अटॅक, पक्षाघात, उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार दूर राहण्यास मदत होते.
  • किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांना भात कोंड्याचे तेल फायदेशीर ठरेल. यासाठी दिवसातून दोनवेळा १० ग्रॅम भात कोंड्याच्या तेलाचा आहारात समावेश करावा.
  • भात कोंड्याचे तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते.
  • रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी भात कोंड्याचे तेल खूप फायदेशीर आहे.