Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर लाईफस्टाईल खाण्याच्या सोड्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?

खाण्याच्या सोड्याचे ‘हे’ फायदे माहिती आहेत का?

जाणून घ्या खाण्याच्या सोड्याचे फायदे.

Mumbai
Benefits Of soda (sodium bicarbonate)
खाण्याच्या सोड्याचे 'हे' फायदे

बऱ्याचदा गृहिणी या खाण्याच्या सोड्याचा वापर स्वयंपाकात करतात. मग तो इडली बनवण्यासाठी असे किंवा केक बनवण्यासाठी असो. यामुळे पदार्थ हलके, खुसखुशीत व्हायला मदत होते. पण, खाण्याचा सोडा मर्यादित स्वरुपात वापरणे केव्हाही हितावह आहे. चला तर जाणून घेऊया खाण्याच्या सोड्याचे फायदे.

कोंडा झाल्यास

केसात कोंडा झाल्यास काही दिवस केसाला शम्पू न लावता खाण्याचा सोडा केसांच्या मुळाशी लावून केस धुतल्यास कोंडा कमी होण्यास मदत होते.

केसांना चमक येते

खाण्याच्या सोड्याने केसांना तसेच त्वचेला चमक येते. आंघोळीच्या पाण्यात अर्धा कप खाण्याचा सोडा टाकून या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेवरील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. विशेष म्हणजे कंडीशनरमध्ये खाण्याचा सोडा मिसळून केस धुतल्याने केसांची चमक वाढण्यास मदत होते.

दातांचा पिवळेपणा

आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी खाण्याचा सोडा अतिशय उपयुक्त आहे. यासाठी थोड्या पाण्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळून बोटाने हळूहळू दातांवर मसाज करुन नंतर तोंड स्वच्छ धुतल्याने दातांवरील पिवळेपणा कमी होतो.

ब्लॅकहेड्सची समस्या

जर कोणाला ब्लॅकहेड्सची समस्या असल्यास खाण्याच्या सोड्यात थोडं पाणी मिसळून घ्या. ही तयार पेस्ट ब्लॅकहेड् असलेल्या जागी लावून १५ मिनिटानंतर गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हे नियमित केल्याने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल.

बगलेतील काळेपणा

बगलेतील काळेपणा दूर करण्यासाठी खाण्याचा सोडा पाण्यात भिजवून त्याठिकाणी लावणे. साधारण ५ मिनिटांनी तो भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. आठवडाभर हा उपाय नियमित केल्यास त्याचा परिणाम निश्चितपणे जाणवतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here