घरलाईफस्टाईलरिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे

रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे

Subscribe

आजार पळवण्यासाठी पाणी पिणे हे एका औषधाचे काम करते. चला तर जाणून घेऊया रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.

पाणी पिणे हा सर्व आजारांवर एक रामबाण उपाय आहे. दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी पिण्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. तसेच आजार पळवण्यासाठी पाणी पिणे हे एका औषधाचे काम करते. चला तर जाणून घेऊया रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे.

पचन सुधारते
सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्याने तुमच्या शरिरातील अशुद्धी बाहेर पडते. तसेच पित्त आणि कफ दूर होण्यास मदत होते. मात्र हे पाणी कोमट असल्यास अति उत्तम. यामुळे पचनक्रियादेखील सुधारली जाते.

- Advertisement -

रोग प्रतिकारक क्षमतेत वाढ
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर फेकले जातात. तसेच रक्त शुद्ध होते आणि आतड्याची कार्यक्षमता वाढते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

वजन कमी होते
दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याने चरबी वितळते आणि अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरिरातील चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते.

- Advertisement -

स्नायू मजबूत होतात
सकाळी पाणी पियल्यामुळे नवीन पेशींना चालना मिळते. त्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

मायग्रेनचा त्रास कमी होतो
मायग्रेनचा त्रास होत असल्यास दररोज सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने तो कमी होण्यास मदत होते.

भूक वाढते
सकाळी पाणी प्यायल्याने आतडे साफ होण्यास मदत होते. त्यामुळे भूक वाढते. ज्या व्यक्तींना भूक न लागण्याची समस्या आहे. त्यांनी दररोज सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्याने त्याचा फायदा होतो.

त्वचा टवटवीत राहते
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने कोशिकांना ऑक्सिजन मिळून त्या सक्रिय राहतात. यामुळे त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त घामाद्वारे शरीरातील अशुद्धी बाहेर निघाल्यामुळे त्वचा स्वच्छ होऊन चमकते.

केस निरोगी राहतात
केस मऊ आणि चमकदार राहण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी पिणे चांगले आहे. रिकाम्या पोटी पाणी पिल्यामुळे केसांच्या मुळांत असलेले मज्जातंतू सक्रिय होतात. त्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते.

उर्जेचा स्तर वाढतो
दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने लाल रक्त पेशी जलद वाढण्यास मदत होते. लाल रक्त पेशी वाढल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

मुतखडा टाळला जातो
पाणी पिणे हा मुतखड्यावरील एक रामबाण उपाय आहे. पाणी कमी प्यायल्याने मुतखड्याचा आजार उद्भवतो. मुतखडा रोखण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. त्यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने मुतखडा टाळण्यास मदत होते.

मुरुमांपासून बचाव
भरपूर पाणी प्यायल्याने कोशिकांना ऑक्सिजन मिळते आणि त्या सक्रिय राहतात. यामुळे मुरुमांपासून बचाव होण्यासाठी जास्त पाणी पिणे आवश्यक असते.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -