घरलाईफस्टाईलनाश्ता रेसिपी - 'बेसन रवा टोस्ट'

नाश्ता रेसिपी – ‘बेसन रवा टोस्ट’

Subscribe

बऱ्याचदा नाश्ता काय करावा, असा सर्वच गृहिणींना प्रश्न पडतो. त्यात तो नाश्ता पौष्टिक असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खमंग आणि चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहोत.

साहित्य

१ वाटी चणा पीठ
अर्धी वाटी रवा
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
लाल मिरची पूड
ब्रेड
तेल
गरजेनुसार पाणी

- Advertisement -

कृती

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये १ कप चणा पीठ, अर्धी वाटी रवा, लाल मिरची पूड, कोथिंबीर मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्यावे. हे सारण थोडेसे जाडसर ठेवावे. त्यानंतर पॅनवर थोडे तेल पसरवून घ्यावे. नंतर ते ब्रेड कट करुन त्या मिश्रणात बुडवून नंतर तेलावर चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले शॅलोफ्राय करुन घ्यावे, अशाप्रकारे बेसन रवा टोस्ट तयार. हे तुम्ही गरम गरम चहासोबत खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -