घरलाईफस्टाईलआहारात 'या' पदार्थांचा समावेश करा आणि डायबिटीजची चिंता सोडा

आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा आणि डायबिटीजची चिंता सोडा

Subscribe

डायबिटीजची चिंता सोडा.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि बिझी अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे डायबिटीजचे पेशेंट दिवसेंदिवस वाढत आहेत. एखदा का डायबिटीज झाले की सर्वच खाण्यापिण्यावर नियंत्रण येते. मात्र, असे काही पदार्थ आहेत. ज्याचे सेवन केल्यास डायबिटीज टाळता येऊ शकतो. चला तर पाहूया असे कोणते पदार्थ आहेत. ज्याचा आहारात समावेश केल्याने डायबिटीजची चिंता मिटण्यास मदत होईल.

मेथी

- Advertisement -

मेथी ब्लड प्यूरीफाय करणे आणि ब्लड शूगर कंट्रोल करण्यात मदत करते. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीदाणे उकळून प्यावे. मेथीचे पाणी डायटमध्येही समाविष्ट करा.

दही

- Advertisement -

दही हे नेहमी आहारात असावे. जेवणासोबत एक वाटी दह्याचे सेवन केल्यास भरपूर प्रोटीन, कॅल्शियम मिळेल. याने वजन कंट्रोल होईल आणि डायबिटीजची शक्यता टळेल.

बदाम

रोज सकाळी दोन भिजवलेले बदाम खा. यामधील व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅटी acid वजन कमी आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यात मदत करते.

हळद

दररोज सकाळी एक लहान चमचा हळदी पावडर खाऊन कोमट पाणी प्या. यामधील करक्युमिन वजन कमी आणि ब्लड शु्गर कंट्रोल करण्यात मदत करते.

दालचिनी

दालचिनीमधील क्रोमियम इंसुलिन कंट्रोल करण्यात मदत करते. त्यामुळे ग्रीन टीमध्ये चिमुटभर दालचिनी पावडर टाकून प्यायल्याने अधिक फायदा होतो.

पालक

पालकामध्ये भरपूर व्हिटॅमिन के, आयरन आणि इतर मिनरल्स असतात. त्यामुळे पालक खाल्ल्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोल होते. याने डायबिटीजची शक्यता कमी होते.

फिश

फिशमध्ये भरपूर ओमेगा ३ फॅटी acid असतात, जे ब्लड शुगर लेवल कमी करण्यात मदत करते. आठवड्यातून एकदा फिश खा. डायबिटीचा धोका टळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -