घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात घ्यावा फळांचा 'आहार'

उन्हाळ्यात घ्यावा फळांचा ‘आहार’

Subscribe

उन्हाळ्यात बऱ्याचदा आहार जात नाही. अशावेळी हलक पण पोट भरेल असे काहीतरी खावेसे वाटते. अशावेळी उन्हाळ्यात खास करुन फळांचे सेवन करावे. यामुळे उन्हाच्या त्रासामुळे होणाऱ्या आजारांपासून तुमचा बचाव देखील होण्यास मदत होते.

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजारदेखील उद्भवतात. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्‍या घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होतो. अशावेळी शरिराला थंडावा आणि पौष्टिक तत्व देणाऱ्या फळांचे सेवन केल्यामुळे शरिराला लागणारी पोषक तत्वे मिळतात त्याचबरोबर उन्हाच्या त्रासामुळे होणाऱ्या आजारांपासून तुमचा बचाव देखील होण्यास मदत होते.

आंबा

उन्हाळा आणि आंबा हे अतूट समीकरण आहे. आंबा हा खास करुन उन्हाळ्यातच उपलब्ध असतो. तसेच आंबा हा सगळ्यांनाच आवडत असल्यामुळे आंब्याचे सेवन करावे. आंब्याच्या सेवनामुळे मोठ्या प्रमाणात आयन मिळते.

- Advertisement -

कलिंगड

उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात घामावाटे पाणी निघून जाते. त्यामुळे अधिक प्रमाणात थकवा निर्माण होतो. अशावेळी कलिंगड या फळाचे सेवन केल्यामुळे आराम मिळतो. कलिंगड या फळामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. त्यामुळे कलिंगडचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवतो ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. त्याचप्रमाणे कलिंगडामध्ये साधारणपणे ९५% पाणी असते म्हणून कालीगंड उन्हाळ्यात जास्तीत जास्त खावे.

अननस

उन्हाळ्यात अननस खाल्याने शरीरातील फॅट्स आणि प्रोटीन्स सहजपणे पचले जाते. तसेच शरीरातील उष्णतेला नियंत्रित ठेवण्यास देखील अननस हे फळ मदत करते.

- Advertisement -

द्राक्ष

अनेक पोषक तत्वांनी संपूर्ण असलेली द्राक्ष खाल्यान्ने तहान – भूक दोन्ही मिटवल्या जातात. त्यामुळे द्राक्षाचे सेवन करावे.

लिंबू

बाराही महिने घरात हमखास आढळणारे फळ म्हणजे लिंबू. लिंबामध्ये खूप प्रमाणात विटामिन्स असतात. त्यामुळे लिंबू सरबताचे सेवन केल्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होऊन ऊर्जा मिळते.

स्ट्रॉबेरी

कडक उन्हाळ्यात बऱ्याचदा अनेकांना लघवीचा त्रास जाणवतो. अशा व्यक्तीने स्ट्रॉबेरी या फळाचे सेवन केल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते.

नारळपाणी

नारळ पाण्यात व्हिटॅमिन, पोटॅशिअम, फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि खनिज तत्व भरपूर प्रमाणात असतात. नारळाच्या पाण्याने केवळ शरीरास सगळे घटक मिळतात असे नाही तर, इतरही समस्यांपासून बचाव होतो. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरते. त्यामुळे लहान मुलांपासून ते आबालवृद्धांनी नारळपाणी प्यायल्यास आरोग्यास फायदेशीर ठरते.

खरबूज

उन्हाळ्यात अगदी सहज आणि स्वस्त मिळणारे फळ म्हणजे खरबूज. जे पाण्याने समृद्ध आणि गोड असते. नेहमी खरबूजाचे सेवन केल्यामुळे शरिरास आराम मिळतो.

केळ

बाराही महिने बाजारात सहज उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळ. केळ खाल्ल्यामुळे पचन क्रिया चांगली राहण्यास मदत होते. तसेच कच्च्या केळ्यांमधील फायबर, इतर पोषण गुणांमुळे भुकेवर ताबा मिळवता येतो. यामुळे केळी खाल्ल्यामुळे लागणारी भूक देखील नियंत्रणात येते.

पेरू

पेरूमध्ये सोडीयम आणि फॅट्स फ्री करणारे घटक असतात. तसेच यात विटामिन्स सी जास्त प्रमाणत उपलब्ध असतात जे आपल्याला खोकला, ताप, जुलाब यांसारख्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -