खमंग भरलेली कार्ली

खमंग भरलेली कार्ली रेसिपी

bharli karli gravy recipe
खमंग भरलेली कार्ली

कारले म्हटले का अनेक जण नाक मुरडतात. मात्र, आजा आम्ही तुम्हाला कारल्याची चटकदार अशी रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजे खमंग भरलेली कार्ली.

साहित्य

  • ८-१० कार्ली
  • २ चमचे दही
  • एक उकडलेला बटाटा
  • एक टेबलस्पून बडीशेप कोरडी भाजून पूड
  • एक – दीड टेबलस्पून धणे जिरे पूड
  • चिमूटभर हळद
  • एक टी स्पून तिखट
  • २-३ टेबलस्पून तेल

कृती

सर्वप्रथम कार्ली उभी चिरुन आतून गर काढून घ्यावा. बाहेरुन पण थोडे सोलून घ्यावे. त्यानंतर कार्ल्याला आतून बाहेरुन मीठ चोळून थोडा वेळ ठेवावे. मग स्वच्छ धुऊन, घट्ट पिळून घ्यावे. नंतर एका मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमधे ठेवून १-१ मिनिट असे मायक्रोवेवह मधून ३-४ मिनिटे वाफवून घ्यावे. एका भांड्यात मंद आचेवर १ टेबलस्पून तेल गरम करावे. अगदी धूर येईपर्यंत गरम करु नये. तेल तापले की त्यात हळद सोडून सर्व मसाले एका पाठोपाठ घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे. गॅस बंद करुन हळद घालावी. नंतर मसाले, मीठ दही, उकडलेला बटाटा हे सर्व नीट एकत्र करुन कार्ल्यामधे भरावे. त्यानंतर एका पसरट पॅनमधे २ टेबलस्पून तेल गरम करुन त्यात कारली ठेवावीत. मंद आचेवर सर्व बाजूंनी खरपूस भाजावीत. अशाप्रकारे खमंग भरलेली कार्ली खाण्यासाठी तयार.