घरलाईफस्टाईलसावधान! आता बर्ड फ्लूचा होतोय फैलाव, ही आहेत लक्षणे

सावधान! आता बर्ड फ्लूचा होतोय फैलाव, ही आहेत लक्षणे

Subscribe

केरळ, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यात अनेक पक्षी मरण पावले आहेत. या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशात कोरोना व्हायरसचा धोका टळत नाही तर आता बर्ड फ्लू हा आजार आला आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूमुळे अनेक पक्षांचा मृत्यू झाला आहे. केरळ, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यात अनेक पक्षी मरण पावले आहेत. या राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. पशु, पक्ष्यांसोबतच माणसांनाही याचा धोका होऊ शकतो. बर्ड फ्लूची लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेऊया.

कफ, डायरिया, ताप, श्वास घेण्यास त्रास होतो. सर्दी आणि घशामध्ये खवखव निर्माण होते. अशी कोणतीही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. बर्ड फ्लूचे अनेक प्रकार आहेत. पण H5N1 हा माणसांमध्ये संक्रमित होणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली केस १९९७मध्ये हॉगकाँगमधून समोर आली होती. H5N1 हा आजार पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या होतो. मात्र पाळीव कोंबड्यांमध्ये हा आजार सहज पसरतो. हा रोग पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत, श्वासामुळे, तोंडातील लाळेमुळे संक्रमित होतो. संक्रमित झालेल्या कोंबड्यांचे मांस १६५ डिग्री सेल्सियसवर शिजवल्यास बर्ड फ्लू पसरत नाही. त्यामुळे कोंबड्यांची कच्ची अंडी किंवा मांस खाणे टाळा.

- Advertisement -

H5N1हा आजार दीर्घकाळ टिकण्याची जास्त शक्यता आहे. बर्ड फ्लू हा पक्षांची विष्ठा आणि लाळेत १० दिवस जिवंत राहू शकतो. एखाद्या दूषित भागात स्पर्श झाल्यास या रोगाचे संक्रमण झपाट्याने होते. कोंबड्यांची पोल्ट्री आहे त्यांना याचा सर्वात जास्त धोका संभवतो. या व्यतिरिक्त जे लोक अशा संक्रमित ठिकाणी जातात, त्या पक्ष्यांच्या संपर्कात येतात त्यांना याचा जास्त धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे जे लोक संक्रमित प्राण्यांची काळजी घेत असतील त्यांनाही याचा धोका होऊ शकतो.

बर्ड फ्लूवर विविध प्रकारे उपचार घेता येतात. परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये अँटीवायरल औषधांद्वारे त्यावर उपचार केले जातात. बर्ड फ्लूची लक्षणे आढल्यास २४ तासांच्या आत औषधे घेणे गरजेचे आहे. बर्ड फ्लूची लक्षणे नाहीत परंतु बर्ड फ्लू झालेल्यांच्या संपर्कात आले असाल तरीही त्या व्यक्तिला औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो.

- Advertisement -

हेही वाचा – येत्या १० दिवसात देशात लसीकरणाला होणार सुरुवात – केंद्रीय मंत्रालय

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -