घरलाईफस्टाईलझटपट बिस्कीट केक

झटपट बिस्कीट केक

Subscribe

झटपट बिस्कीट केक रेसिपी.

केक म्हटलं का कधीही खावासा वाटणारा पदार्थ आणि हाच पदार्थ झटपट कसा करायचा असा अनेकांना प्रश्न देखील पडतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला झटपट बिस्कीट केक कसा तयार करायचा हे दाखवणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • हाईड अँड सिक बिस्किटांचे दोन मध्यम पुडे
  • पारले जी बिस्किटांचा एक पुडा
  • ८ चमचे साखर
  • दीड कप दूध
  • खाण्याचा सोडा
  • कोणाताही फ्लेवर नसणारा इनो फ्रुट सॉल्ट्चा एक छोटा सॅशे

कृती

सर्वप्रथम हाईड अँड सिकची अणि पारले जी ची बिक्सिटे एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावित. त्यात आठ चमचे साखर घालून मिक्स करावीत आणि इनो सॉल्ट त्यावर टाकावे. खाण्याचा सोडा असेल तर तो चहाचा एक चमचा अथवा अर्धा चमचा या प्रमाणात टाकावा. त्यानंतर दूध घालत हळूहळू हाताने ढवळावे. बिस्किटात चॉकलेट असल्याने हे मिश्रण जरा चिकट होते. खूप वेळ ढवळू नये. इनोचे मिश्रण थोडेसे फसफसते. केकच्या भांड्याला आतून तूप लावून हे मिश्रण तव्यावर ठेऊन अर्धा तास गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवावे. अगदी छान स्पाँजी चॉकलेट केक तयार होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -