काळे मनुके आरोग्यासाठी लाभदायक

आरोग्यदायी काळा मनुका

Mumbai
black Raisins benefits for health
काळे मनुके आरोग्यासाठी लाभदायक

सुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा आणि सर्व गोडाधोडाच्या खाद्यपदार्थांमध्ये हमखास वापरला जाणारा प्रकार म्हणजे मनुका. मात्र, या मनुक्यामध्ये दोन प्रकरा असतात. एक काळा मनुका आणि एक साधा मनुका. त्यातील काळा मनुका हा द्राक्षापासून तयार केला जातो. दरम्यान, काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी आणि श्रेष्ठ मानली जातात. तसचे काळ्या द्राक्षावर प्रक्रिया करुन त्याचा काळा मनुका तयार केला जातो. या काळ्या मनुक्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. चला तर जाणून घेऊया आरोग्यदायी काळा मनुका

हार्ट अॅटेकचा धोका कमी

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसेच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. ज्यामुळे हार्ट अॅटेकचा धोका कमी होतो.

केस गळती थांबते

काळ्या मनुकामध्ये असलेल्या विटॅमिन ‘इ’ मुळे केस गळणे, केस पांढरे होणे यासारख्या समस्या दूर होतात. काळी द्राक्ष खाल्याने केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते. त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.

एकाग्रता वाढायला मदत होते

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसेच मायग्रेनसारखा आजारही बरा होतो.

वजन होते कमी

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकते. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचे असलेले टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होते. त्यामुळे ज्यावेळी काळी द्राक्षे बाजारात नसतात, त्यावेळी काळे मनुके खाणे फायदेशीर ठरते.

डोळ्यांसाठी गुणकारी

दृष्टी सुधारण्यासाठीही काळे मनुके गुणकारी ठरतात.

सुरकुत्या होतात कमी

काळ्या मनुक्यांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.

अपचन होत नाही

काळ्या मनुक्यांमध्ये शुगर, ऑरगॅनिक अॅसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.

ब्लड प्रेशरवर नियंत्रण

काळे मनुके नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. काळ्या मनुक्यामध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो. ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढते. त्यामुळे काळे मनुके खाल्यामुळे शरिरातले रक्त वाढायलाही मदत होते. त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.