घरलाईफस्टाईलशरीरात रक्त वाढविणारे पदार्थ

शरीरात रक्त वाढविणारे पदार्थ

Subscribe

आज ६० ते ८० टक्के महिला अ‍ॅनिमियाच्या (रक्ताल्पता) शिकार आहे. भोजनाचे असंतुलन आणि हिमोग्लोबीनची कमतरता यांनी हा रोग वाढत जातो. शरीरामध्ये रक्ताची कमतरता ३ प्रमुख कारणांनी होते.

* लोहतत्त्वाची कमतरता
* फॉलिक आम्लाची कमतरता
* व्हिटॅमिनची बी१२ ची कमतरता शरीरात रक्ताची कमतरता झाल्यास आहारामध्ये हिरव्या भाज्यांचे मिश्रण भरपूर मात्रेत असावे. रक्ताल्पतेत पुढील पदार्थ फायदेशीर ठरतात.

- Advertisement -

केळे – प्रात:काळी तीन केळी खाऊन दुधामध्ये साखर, वेलची मिसळून नित्य पित राहण्याने रक्ताची कमतरता दूर होते. हा एक पौष्टिक नाश्ता आहे.

द्राक्षे – नियमित १० औंस द्राक्षांचा रस पित राहण्याने रक्ताल्पता कमी होते.

- Advertisement -

लिंबू – ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा लोकांनी लिंबू आणि टोमॅटोचा भोजनामध्ये नियमित समावेश केल्यास लाभ होतो.

आवळा – अर्धा कप आवळ्याच्या रसामध्ये २ चमचे मध आणि थोडेसे पाणी मिसळून पिण्याने लाभ होतो.

बेल – बेलाचा सुका गर वाटून घ्यावा. गरम दुधामध्ये याचे २ चमचे आणि स्वादानुसार वाटलेली खडीसाखर मिसळून प्यावे. हे एक चांगले रक्तवर्धक टॉनिक आहे.

बीट – बीट रक्त वाढविते.

गाजर –२५० ग्रॅम गाजराच्या रसामध्ये पालकाचा रस मिसळून प्यावे.

कांदा –कांद्याचा रस अथवा कच्चा कांदा खाण्याने रक्त वाढते. कारण कांद्यामध्ये लोह भरपूर मात्रेत असते.

दही – दह्याची लस्सी नित्य पिण्याने दुर्बलता दूर होते.

मध – रक्ताच्या कमतरतेत दिवसातून ३ वेळा मध पाजावे.

पालक – अर्धा ग्लास पालकाच्या रसात २ चमचे मध मिसळून ५० दिवसांपर्यंत प्यावे. याने शरीरामध्ये रक्ताची वृद्धी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -