चाळिशी ओलांडूनही अविवाहीत आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री!

Mumbai
bachelor bollywood actress
ब्राॅलिवूडच्या अविवाहित अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु होता. अलिकडेच अभिनेत्री सोनम कपूर, नेहा धुपिया आणि त्यानंतर हिमेश रेशमिया हे कलाकार विवाहबद्ध झाले. मात्र वयाची 40 ओलांडली तरी या अभिनेत्री अविवाहीतच आहेत.

पहा कोण आहेत या अभिनेत्री…

या यादीत पहिले नाव आहे अभिनेत्री फातिमा हाश्मी म्हणजे तब्बू. तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1971 मध्ये आंध्रप्रदेशातील हैद्राबादमध्ये झाला. 1994 मध्ये तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. अजूनही ती सातत्याने काम करत आहे. आपल्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये तिने 22 सिनेमांमध्ये काम केले आहे. 46 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही अविवाहीतच आहे. दक्षिणेतील अभिनेता नागार्जुनसोबत तिचे नाव जोडले गेले होते.

दुसरे नाव आहे विश्वसुंदरी सुष्मिता सेनचे. 1996 मध्ये बॉलिवूडमध्ये तिने पर्दापण केले. 22 वर्षात तिने 35 सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 19 नोव्हेंबर 1975 मध्ये हैद्राबादमध्ये तिचा जन्म झाला. 42 वर्षांची ही अभिनेत्री अविवाहीत असून पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत तिचे नाव जोडले गेले होते.

या यादीतील शेवटचे नाव आहे अभिनेत्री अमिषा पटेलचे. 2000 मध्ये आलेल्या मेगाब्लॉकबस्टर सिनेमा कहो ना प्यार है मधून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर तिने तेलगू आणि तमिळ सिनेमातही काम केले. अमिषा पटेलचा जन्म 9 जून 1975 मध्ये जाला. 18 वर्षात अमिषाने 33 सिनेमांमध्ये काम केले. अमीषा तिचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यावरुन अनेकदा ती ट्रोलही होते.

‘बाहुबली’च्या अभिनेत्रीने विदेशी तालावर ठुमके, चाहते घायाळ!

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर सिरीजमध्ये ‘अवंतिका’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तमन्नाने या व्हिडीओमध्ये आपले डान्स स्किल्स दाखविले आहेत. तमन्ना विदेशी संगीतावर देसी अंदाजात थिरकताना दिसत आहे. तमन्नाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती डीजे स्नेकचे ‘मजेंटा रिदिम’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे. तमन्ना अशा अंदाजात डान्स करीत आहे की, कोणीही तिच्या प्रेमात पडेल. सध्या तमन्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते त्यास प्रचंड प्रमाणात पसंत करीत आहेत. डीजे स्नेकने या व्हिडीओविषयी सांगितले की, ‘मला भारतात शूटिंग करताना आनंद वाटला. यावेळी मी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेतला. भारत मला नेहमीच आवडतो. दरम्यान, बाहुबलीची अभिनेत्री असलेल्या तमन्ना भाटियाला मजेंटा रिदिमच्या संगीतावर देशी अंदाजात ठुमके लावताना बघणे खरोखरच मजेशीर आहे. भारतीय संस्कृतीचे एवढे रूपं बघून मला खरोखरच खूप आनंद झाला आहे.

दरम्यान, या व्हिडिओची सुरुवात डीजे स्नेकच्या भारत शूटिंग दरम्यान झाली होती. डीजे स्नेकने ‘बाहुबली-2’ हा चित्रपट बघितला होता. हा चित्रपट तमन्नानेच त्याला पाठविला होता. कारण ती हैदराबादमध्ये त्याला भेटू शकली नव्हती. याविषयी तमन्नाने सांगिंतले की, मी गाणे ऐकले होते आणि मला ते खूपच आवडले होते. त्यानंतर डीजे स्नेक आणि माझ्यात बरीचशी चर्चा झाली होती. पुढे मी त्याला या गाण्याविषयी माझी फिलिंग सांगितली. त्यानंतर डीजे स्नेकने तमन्नाला या गाण्यावर डान्स करण्याचे एक चॅलेंज दिले.

दरम्यान, तमन्ना डीजे स्नेकचे हे चॅलेंज स्वीकारताना या गाण्यावर आपला देशी अंदाज दाखविला. या अगोदर मजेंटा रिदिमवर आधारित एका व्हिडीओमध्ये जेठालाल आणि दयाबेन यांचा एक डान्स मिक्सवाला व्हिडीओ डीजे स्नेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here