घरलाईफस्टाईलप्रतिकारशक्ती वाढवा, साथीचे रोग टाळा !

प्रतिकारशक्ती वाढवा, साथीचे रोग टाळा !

Subscribe

पावसाळा सुरू आहे. साथीच्या आजारात वाढ झालेली आहे. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही या आजारांना घाबरुन न जाता, यावर घरगुती उपाय करुन साथीच्या रोगांपासून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दूर ठेवू शकता.

आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकजण जाहिरातांचे अनुकरण करतात. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्या आहारात काही सातत्यपूर्ण बदल करावे लागतात. काही छोट्या गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो. घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंचा योग्य व नियमित वापर केला तर आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.

तुळस
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पाने दररोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्ग होत नाही तसेच त्याला अटकाव होतो.

- Advertisement -

तूप
कोणत्याही वयोमानात शरीराचे पोषण करायचे असेल तर अर्धा चमचा तूप खावे. घरी लोणी कढवून काढलेले तूप अतिशय चांगले. अनेकजण आपल्या आहारात चीज, बटर असल्याचे सांगतात. पण जी कमाल अर्धा चमचा तूप करते ती या पदार्थांना जमत नाही.

लिंबू
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असते. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. लिंबू खावे, पण लिंबाचे लोणचे खाणे टाळावे.

- Advertisement -

आवळा
आवळा हा प्रामुख्याने हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते.

पाणी
आरोग्याच्यादृष्टीने पाण्याला अधिक महत्त्व आहे. आपल्या शरीरात जास्त पाणी असते. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानेच भागेल. तहान लागली पाणी नाही म्हणून दूध, मिल्क शेक, नारळपाणी, ज्यूस घेतले तर तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर बाहेर टाकले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाणी महत्त्वाचे आहे.

नाचणी सत्व
दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचे सत्व हवेच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्व असतात. हे नाचणी सत्व दिवसातून एकदा तरी शरीरात जाणे आवश्यक आहे.

बीट
रोजच्या आहारात बीटचा समावेश केल्यास शरीराला जीवनसत्त्व, खनिजे, अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे.

दूध-हळद
रात्री जेवल्यानंतर एक कपभर दूध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी आणि ते दूध रोज प्यावे. लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दुधात थोडे केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -