घरलाईफस्टाईल'कोबी'ची खमंग वडी

‘कोबी’ची खमंग वडी

Subscribe

कोथिंबीर वडी, अळूवडी जेवणात असल्यास जेवणाला अधिकच रंगत येते. अशावेळी जर तुमच्या जेवणात खमंग अशी कोबीची वडी असेल तर जेवायला अधिकच मज्जा येते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी खास अशी कोबीची वडी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

२०० ग्रॅम कोबी
१ मोठी जुडी कोथिंबीर
६-७ हिरव्या मिरच्या
१ वाटी डाळीचे पीठ
चवीनुसार मीठ
३ मोठे चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
तळणीसाठी तेल

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम कोबी, कोथिंबीर आणि हिरवी मिर्ची बारीक चिरुन घ्यावी. त्यानंतर तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग, हळद क्रमाने घालून त्यावर कोबी घालून घ्यावा. त्यानंतर सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर ३-४ मिनिटे परतवून घ्यावे. नंतर एका दुसऱ्या भांड्यात डाळीचे पिठ घेऊन त्यात मीठ आणि पाणी घालून गुळगुळीत मिश्रण कालवावे. त्यानंतर कोबीवर हे पीठ ओतावे आणि मंद आंचेवर शिजू द्यावे. नंतर एका थाळीला किंवा ट्रेला तेलाचा हात फिरवून त्यावर हे पीठ थापावे. तेलाच्या हाताने पृष्ठभाग सारखा करावा आणि गार झाले की चौकोनी वड्या कपाव्या. त्यानंतर तव्यावर बाजूने तेल सोडून वड्या परतून घ्यावा आणि सॉस किंवा चहासोबत खायला द्याव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -