घरलाईफस्टाईलशरीरातील कॅल्शियमची कमतरता

शरीरातील कॅल्शियमची कमतरता

Subscribe

आधुनिक जीवनशैलीत अधिक प्रमाणात शुगर (चॉकलेट, केक, आइसक्रीम, थंड पेय) घेण्याने कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. ही समस्या आजकाल सामान्य होत चालली आहे. फक्त प्रौढच नव्हे तर तरुण मुलेही याचे बळी पडत आहेत. वर्षानुवर्ष कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्यानंतरही परिणाम निराशाजनक दिसत आहे. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर.

कॅल्शियम कमतरतेची लक्षणे

  • हाडे पोकळ होणे, दुर्बल होऊन तुटणे
  • कंबर वाकणे
  • दात गळणे
  • मुलांना उशिरा दात येणे
  • शरीरात अशक्तपणा असणे, इत्यादी

कॅल्शियम कमतरतेचे कारण

  • पचनशक्ती कमजोर झाल्याने जेवणातून कॅल्शियमचे पोषण कमी होणे
  • रोजच्या जेवणात कॅल्शियमयुक्त पदार्थांची कमी
  • बायकांना मासिक पाळीत अधिक स्त्राव होणे
  • नवजात बालकांमध्ये स्तनपानाचा अभाव
  • ऊन, शारीरिक श्रमाचा अभाव
  • अधिक प्रमाणात गोड पदार्थाचे सेवन करणे

कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थ

धान्य : गहू, बाजरी, नाचणी

- Advertisement -

मूळ व कंद : नारळ, रताळे

दूध : दूध व दुधाचे सर्व पदार्थ

- Advertisement -

डाळी : मूग डाळ, सोयाबीन, वाटाणे, मटकी, राजमा

हिरव्या भाज्या : कढीपत्ता, कोबी, अरवीची पाने, मेथी, मुळ्याची पाने, पुदिना, कोथिंबीर, काकडी, गवार, गाजर, भेंडी, टोमॅटो

मेवा : मनुका, बदाम, पिस्ते, अक्रोडाचे तुकडे आणि खरबुजाच्या बिया

फळं : नारळ, आंबा, जाम, सीताफळ, संत्रं, अननस

मसाले : ओवा, जिरे, हिंग, लवंगा, कोथिंबीर, मिरपूड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -