व्यायाम करताना घ्यायची काळजी

Mumbai
Fitness

उत्तम आरोग्यासाठी सकस आहारासोबत नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. मात्र व्यायाम करताना अनेकदा चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने, व्यायाम करण्याच्या फायद्यांऐवजी त्याचे तोटेच जाणवू लागतात. त्यामुळे व्यायाम करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

♦ उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करण्याचे निश्चित केले असेल तर प्रथम व्यायाम करताना सुरुवातीच्या काही दिवस खूप व्यायाम करू नये. तसेच दररोज झेपेल तेवढाच व्यायाम करत दररोज थोडा थोडा व्यायाम वाढवावा.

♦ व्यायामानंतर सुक्या टॉवेलने किंवा हातांनी सर्व शरीर रगडून घ्यावे. यामुळे व्यायामामुळे पेशींमध्ये वाढलेला वात कमी होतो. तसेच घर्षणातून एकप्रकारचा विद्युतप्रवाह निर्माण होऊन तो शरीरातील रोगांना नष्ट करतो.

♦ व्यायाम झाल्यावर लगेचच अंघोळ न करता ३० मिनिटांनंतर अंघोळ करावी. या मधल्या वेळात तुम्ही लहानसहान कामे करू शकता.

♦ व्यायाम करण्यापूर्वी संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करावे.

♦ व्यायाम झाल्यावर १५ मिनिटे शांत बसून वाचन करावे. त्यानंतर ५ मिनिटे अंगाला तेल लावून थोडा वेळ थांबून अंघोळ करावी.

हे लक्षात ठेवा
♦व्यायाम करताना घामामुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी व्यायाम करताना मधून मधून थोडं पाणी प्यावं.
♦शरीरातील इलेक्ट्रॉलची पातळी घटणार नाही, याची काळजी घ्या.
♦दररोज सहा ते सात लिटर पाणी प्या.
♦खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा.
♦वजनावर नियंत्रण ठेवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here