घरलाईफस्टाईलएकुलत्या एका मुलाला वाढवताना घ्या ही काळजी

एकुलत्या एका मुलाला वाढवताना घ्या ही काळजी

Subscribe

हल्ली बहुतांश घरात आपल्याला एकच मूल बघायला मिळतं. हे मूल घरात सगळ्यांच लाडकं असतं, सगळ्यांचा केंद्रबिंदू असतो. एका शब्दात सांगायचं तर ते मूल सगळ्यांसाठीच व्हीआयपी झालेलं असतं.

सध्या विभक्त कुटूंबपद्धती सोबतच एकच मूल ही संकल्पना वाढलेली दिसून येते. त्याचे कारण वेग-वेगळे असू शकते. जसे की, आर्थिक परिस्थिती किंवा कुटूंबातील दोघेही नोकरीवर असल्या कराणाने ते एकाच मुलाचे संगोपन करण्याचे ठरवतात.

त्यामुळे हल्ली बहुतांश घरात आपल्याला एकच मूल बघायला मिळतं. हे मूल घरात सगळ्यांचं लाडकं असतं, सगळ्यांचा केंद्रबिंदू असतो. एका शब्दात सांगायचं तर ते मूल सगळ्यांसाठीच व्हीआयपी झालेलं असतं. या सर्वांच्या लाडाचा, प्रेमाच्या अतिरेकाचा मुलांच्या वागणुकीवर परिणाम होतो.

- Advertisement -

परिणामी एकुलते एक मूल आपली खेळणी पुस्तकं, खाऊ इत्यादी सहजासहजी इतरांना देण्यास तयार होत नाही. अशी मुले मोठी झाल्यावर कोणत्याही भावनिक सुख दु:खाच्या प्रसंगांना तोंड देण्यास तयार नसतात. तसेच मोठे झाल्यावर कोणतही सुख-दु:ख वाटण्याच्या मानसिकतेपासून वंचित असतात.

मुलांना घडविताना पालकांनी त्यांना योग्य शिक्षण, शाळा, सुविधा देणे जितके महत्वाचे तितकेच त्यांना
योग्य समाजभान, देणे देखील महत्वाचे असते.

- Advertisement -

त्यामुळे एकुलत्या एका मुलाला वाढवताना संपूर्ण कुटूंबानेच थोडी सावधगिरी घेणे आवश्यक ठरते. जेणे करुन पुढील आयुष्यात या मुलांना त्रास होणार नाही.

* तुमचे लाड, प्रेम यावर मर्यादा आणा आणि काही कामं मुलांना मुलांची करू देण्यावर भर द्या. एकुलत्या एका मुलाच्या प्रेमापोटी बर्‍याचदा पालक मुलांना सर्व आयते देतात आणि याची मुलांना सवय होते.

* मुलांनी कुठलीही गोष्ट मागितली की, लगेचच आणून देऊ नका. नकार पचवण्याची सवय त्यांना लावा.

* एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने मुलाला काही खाऊ आणून दिला तर ते घरातील सर्व सदस्यांना वाटून मग स्वत: खायची सवय मुलांना लावा. म्हणजे सगळं माझं ही भावना नाहीशी होऊन सगळ्यांना देण्याची सवय मुलांच्या अंगात आपोआप रुजेल.

* मुलांच्या मित्रांना भावंडांना आवर्जून तुमच्या घरी बोलवा. यावेळेस तुमचे मूल इतरांशी कसे वागते याचे निरीक्षण करा. खेळणी, खाऊ मुलांना वाटण्याची सवय लावा. ही सवय मुलांना मोठेपणी खूप उपयुक्त ठरेल.

* मुलांना फालतू खर्च करण्यापासून रोखा. आजकाल दोघेही नोकरीवर असल्याकारणाने मुलांना आई-वडीलांकडून पॉकेटमनी देण्यात येतो. मुलांना त्या पैशांचा योग्य वापर करायला शिकवा.

* बर्‍याचदा असं एकुलते एक मूल आहे म्हणून आणि आई-वडील दोघेही नोकरीवर असल्यामुळे मुलांना सर्व गोष्टी आयत्या मिळत असतात. तसे न करता मुलांना थोडी शारीरिक कष्टाची सवय लावा. सगळ्या सोयी सुविधा त्यांना देऊ नका. थोडासा त्रास सहन करण्याची वृत्ती त्यांच्या अंगात आणण्याचा प्रयत्न करा.

* मुलं जर एकांतप्रिय झाली असतील तर त्यांना इतर मुलांच्या सतत खेळायला पाठवा. वेग-वेगळ्या शिबीरांमध्ये/अ‍ॅक्टीव्हीटीमध्ये जसे सुट्टी विशेष शिबीरे, समर कँप इत्यादीमध्ये मुलांना सहभागी करा.

* मुल खर्चिक आणि हट्टी होणार नाहीत याची काळजी घ्या. बर्‍याचदा एकुलते एक मूल आहे म्हणून आई-वडील मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकतात. त्यामुळे मुलांना ती सवय लागते आणि परिणामी मूल हट्टी होतं.

* बर्‍याचदा मुले कंटाळा येतो म्हणून लग्न/ समारंभात येण्याचे टाळतात त्याऐवजी ते एकटे घरी थांबणे पसंत करतात. तर असे करू नका, मुलांना सण-समारंभात आवर्जून सोबत नेत रहा. जेणे करुन त्यांना इततरांमध्ये मिसळण्याची सवय लागेल.

* मुलांना शाळेतील सुट्ट्यांमध्ये इतर नातेवाईकांकडे (काका, मामा,मावशी,आत्याकडे) भावंडासोबत रहायला पाठवावे. जेणेकरून ते त्यांच्या समवयस्क वयातील मुलांशी मनमोकळे संवाद करायला शिकतील. स्वत:च्या भावना व्यक्त करायला शिकतील. सोबतच आई – वडिलांपासून थोडे दिवस दूर राहिल्याने स्वत:ची काळजी स्वत: घ्यायला शिकतील. तसेच वेळ प्रसंगी त्यांना आई -वडिलांपासून दूर राहण्याचे काम पडल्यास ते त्यांना कठीण जाणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -