सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात गाजर दाखल झाले आहेत. गाजर म्हटलं की, अनेक जण गाजराचा हलवा करतात. पण, जर तुम्हाला गाजराची एखादी नवी रेसिपी ट्राय करायची असेल तर गाजराची खीर नक्की करा.
साहित्य
- १ कप किसलेले गाजर
- १ लीटर दूध
- १ कप तूप
- १ चमचा साखर
- गरजेनुसार काजू
- गरजेनुसार मनुका
- वेलची पूड
कृती
सर्वप्रथम एका पॅनमध्ये १ कप तूप चांगले गरम करुन घ्या. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये ७ ते ८ काजू चांगले फ्राय करुन घ्यावे. त्यानंतर फ्राय केलेले काजू बाजूला काढून घ्यावेत. त्यानंतर त्यात गाजराचा किस चांगला परतवून घ्यावा. नंतर पॅनमध्ये एक लिटर दूध मिक्स करावे. नंतर दूध आणि गाजर सारखे परतून घ्यावे. जेणेकरुन खीर पॅनला चिकटणार नाही. हे सारे मिश्रण ८ ते १० मिनिटांसाठी चांगले उकळू द्या. खीर उकळून घट्ट होऊ द्या. आता त्यामध्ये चार चमचे साखर मिक्स करा. साखर विरघळली आहे की नाही, याची खात्री करून घ्या. त्यानंतर खिरीमध्ये फ्राय केलेले काजू, मनुका आणि चिमूटभर वेलची पूड मिक्स करा. पुन्हा एकदा सर्व सामग्री ढवळून घ्या, अशाप्रकारे गरमागरम गाजराची टेस्टी खीर तयार.