‘चॉकलेट केक’ रेसिपी

'चॉकलेट केक' रेसिपी

Mumbai
chocolate cake recipe in marathi
चॉकलेट केक

केक म्हटलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. मात्र, अनेकदा बाजारातील केक खाण्यापेक्षा घरात बनवलेला केक खाण्यात एक वेगळीच मज्जा असते. तसेत तो स्वत:च्या हाताने बनवलेला असल्यास तो अधिक चविष्ट लागतो.चला तर जाणून घेऊया घरगुती चॉकलेट केकची रेसिपी.

साहित्य

१ कप मैदा
५० ग्रॅम कोको पावडर
१ कप कनडेंस्ड मिल्क
अर्धा कप पिठी साखर
३ ते ४ चमचे दूध
८० ग्रॅम बटर
१० ते १२ काजू
१ छोटा चमचा बेकिंग पावडर
/४ छोटा चमचा बेकिंग सोडा

कृत्ती

सर्वप्रथम मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा चाळून घ्या. त्यानंतर पिठी साखरमध्ये बटर एकत्र करुन ते फेटून घ्या. चांगल फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये कनडेंस्ड मिल्क घालून पुन्हा एकदा सर्व सारण एकजीव करुन त्यामध्ये दूध घालून चांगले फेटून घ्या. सर्व सारण फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये १० ते १२ काजू घालून पुन्हा एकदा सारण एकजीव करुन घेणे. त्यानंतर एका भांड्यात बटर लावून त्यावर मैदा पसरवून घ्या. त्यानंतर एकजीव केलेले सर्व सारण त्या भांड्यात घालून ते भांडे सेट करुन घ्या. कुकरमध्ये केक बनवायचा असल्यास त्या कुकरची रिंग आणि शिट्टी काढून कुकरमध्ये मीठ घालून कुकर २० ते २५ मिनिटे तापून घ्या. त्यानंतर ते केकचे भांडे स्डँवर ठेऊन ४० मिनिटे केक बनवण्यासाठी ठेऊन द्या. अशाप्रकारे तुमचा घरच्या घरी कुकरमधला केक तयार होऊन तो केक सर्व्ह करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here