घरलाईफस्टाईलसनग्लासेस निवडताना

सनग्लासेस निवडताना

Subscribe

हल्ली सनग्लासेस वापरणे ही केवळ फॅशन राहिली नसून, डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सनग्लासेस वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्याचे काम सनग्लासेस करतात. विविध आकाराचे, ब्रॅण्डसचे सनग्लासेस बाजारात सहज उपलब्ध असतात. सनग्लासेसची निवड करताना काळजी न घेतल्यास ते आपल्या चेहर्‍याला साजेसे दिसत नाहीत.

चेहर्‍यानुसार सनग्लासेसचा आकार निवडा – वेगळ्या स्टाईलचे सनग्लासेस निवडताना आपल्या चेहर्‍याची ठेवण कशी आहे हे लक्षात घेत सनग्लासेसची निवड करा. बदामी, गोलाकार चेहर्‍याच्या माणसांना कॅट आय सनग्लासेस, अंडाकृती, चौकोनी चेहर्‍याच्या माणसांना एव्हिएटर प्रकारचे सनग्लासेस छान दिसतात. त्याचप्रमाणे अंडाकृती चेहर्‍याच्या माणसांना ओव्हर साईझ सनग्लासेस देखील छान दिसतात.

- Advertisement -

सनग्लासेसच्या रंगाची निवड – रंग ठरवताना आपल्या त्वचेचा रंग लक्षात घ्या. मुख्यत्वेकरुन दोन प्रकारचे स्कीन टोन असतात. एक कूल आणि दुसरा वॉर्म स्कीन टोन. हातांच्या नसांचा रंग निळा असेल तर तुमचा स्कीन टोन कूल आहे आणि हातांच्या नसांचा रंग हिरवा असेल तर तुमचा स्कीन टोन वॉर्म आहे असे समजावे. कूल स्कीन टोनच्या व्यक्तींनी निळ्या रंगछटेच्या सनग्लासेसची निवड करावी आणि गुलाबी, करडा, काळा, गुलाबी, जांभळ्या किंवा प्रिंटेड रंगछटा असलेल्या फ्रेम निवडाव्यात. वॉर्म स्कीन टोनच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगछटेच्या सनग्लासेसची निवड करावी.

युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेस निवडा – तसेच सनग्लासेस निवडताना ते युव्ही प्रोटक्टेड आहेत की नाही हे पाहून घ्यावे. कारण सनग्लासेसचा उपयोग डोळ्यांचे उन्हापासून रक्षण करणे हा आहे. युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेसच्या लेन्सवर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया केली जाते. यामुळे सूर्यापासून निघणारे प्रकाशकिरण परावर्तित होतात आणि डोळ्यांना थंडावा मिळतो.

- Advertisement -

योग्य लेन्सचे सनग्लासेसची निवड करा – हिरवा, चॉकलेटी, पिवळा, निळा, राखाडी आणि गुलाबी अशा रंगात सनग्लासेसच्या लेन्स उपलब्ध असतात. पैकी हिरव्या रंगाचे सनग्लासेस हे सगळ्याच ठिकाणी वापरायला योग्य आहेत. जवळपास सर्वच ऋतुंमध्ये हे सनग्लासेस वापरू शकतो. प्रखर उन्हात घराबाहेर पडायचे असल्यास चॉकलेटी किंवा अंबर रंगाचे सनग्लासेस विकत घ्यावे. हिवाळ्यात गिर्यारोहणासाठी बाहेर पडत असल्यास यलो शेडचे सनग्लासेस घ्या. या सनग्लासेसमुळे धुसर ठिकाणी स्पष्ट दिसण्यास मदत होते.

रस्त्यावरील स्वस्त सनग्लासेस टाळा – तुम्ही 3 ते 4 तासांहूनही अधिक काळ उन्हात फिरत असाल तर रस्त्यावरून घेतलेले स्वस्त सनग्लासेस वापराने टाळा. कारण यामुळे तुमच्या नाजूक डोळ्यांना त्रास होऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -