कॉफी आणि बरचं काही

Mumbai
कॉफी

स्ट्राँग, हॉट, ब्लॅक, मिल्की, विदाऊट शुगर किंवा विथ शुगर कॉफी पिणार्‍यांची तर्‍हाच वेगळी. तरुणांमध्ये तर चहापेक्षाही कॉफी पिणार्‍यांची संख्या जास्त आहे. आता जागोजागी कॉफीसाठीचे आऊटलेट सर्रास उपलब्ध असतात. या कॉफी शॉप्समध्ये जो प्रकार आपण मागवतो त्यांची नावही वेगवेगळी असतात. आपण नेहमी विविध प्रकारच्या कॉफीचा आस्वाद घेतो. मात्र, या नावांप्रमाणे कॉफीची चवही वेगळी असते हे आपल्याला ठाऊक आहे का? जाणून घेऊया कॉफी आणि त्याच्या प्रकाराबाबत बरचं काही

१. एस्प्रेसो
याला ब्लॅक कॉफीही म्हटलं जातं. हा कॉफीचा महत्त्वाचा घटक आहे. देशभरात जितके कॉफी प्रकार आहेत ते या मिश्रणात बनवूनच तयार होतात. ही स्ट्राँग कॉफी जगभरात प्रसिद्ध आहे. पाणी उकळून त्यात एस्प्रेसो पावडर मिसळून आवडीनुसार साखर टाकून ही कॉफी बनवली जाते.

२. एस्प्रेसो मॅक्कीआटो
एस्प्रेसो कॉफीच्या या प्रकारात उकळलेलं दुध टाकलं जातं. हा एस्प्रेसोचाच एक प्रकार आहे. फक्त दुध मिसळ्यामुळे त्याच्या चवीत बदल होतो. डार्क कॉफी पिणारे एस्प्रेसो मॅक्कीआटोची निवड करतात.

३. कॅपोचिनो
जगभरात कोणत्याही कॉफी शॉपमध्ये कॅपेचिनो हा प्रकार हमखास मिळतो. या कॉफी प्रकारात एस्प्रेसोमध्ये दुध मिसळल जातं. सोबतच चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट पावडरने वरून सजावट केली जाते.

४. कॅफे लॅथे
या कॉफी प्रकारात एस्प्रेसो कॉफीमध्ये तिप्पट दुध मिसळलं जातं. दुधाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही कॉफी सफेद दिसू लागते. आवडीनुसार साखरही मिसळू शकतो. कुकीज आणि पेस्ट्रीसोबत या कॉफीचा स्वाद घेण्याची मज्जाच निराळी असते.

५. मोचा चिनो
कॅपेचिनो कॉफीमध्ये कोको पावडर मिसळून मोचा चिनो कॉफी बनवली जाते. या कॉफीमध्ये गार्निशिंगसाठी व्हीप्ड क्रीमचा वापर केला जातो.

६. आयरिश कॉफी
आयरिश कॉफी ही सर्वाधिक लोकप्रिय कॉफी प्रकारांपैकी एक आहे. ही कॉफी बनवण्यासाठी व्हिस्की, एस्प्रेसो आणि साखरेचा वापर करतात.

७. इंडियन फिल्टर कॉफी
दक्षिण भारतात फिल्टर कॉफीची निर्मिती झाल्याचे समजते. कॉफीच्या सुकलेल्या बियांपासून ही बनवली जाते. यामध्ये दुध आणि साखरही मिसळतात. इतरांपेक्षा ही कॉफी जास्त गोड असते.

८. व्हाइट कॉफी
हा कॉफी प्रकार मलेशियातून भारतात आला आहे. पाम तेलात कॉफी बीन्स मिसळून ही कॉफी बनवली जाते. दुध आणि साखर मिसळून ही कॉफी जास्त चवदार बनवली जाते .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here