घरलाईफस्टाईलथंडी आणि त्वचा

थंडी आणि त्वचा

Subscribe

थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडण्यास सुरूवात होते. अनेक जणांना त्वच्या कोरडी पडल्याने खाज येण्याची समस्या सुरू होते. त्वच्या खाजवल्यानंतर या दिवसांमध्ये त्वच्या लालसर होऊन त्यावर पांढर्‍या रेषा उमटतात. अशा एक न अनेक थंडीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत.

* गरम पाण्याने जास्त वेळ अंघोळ करू नये
या दिवसांमध्ये भरपूर वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या त्वचेतील प्रॉटेक्टिव ऑईल निघून जाते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्याला खाज येण्यास सुरूवात होते. त्यासाठी या दिवसांमध्ये जास्त वेळ गरम पाण्यात अंघोळ करणे टाळा. साधारण 15 मिनिटे अथवा त्यापेक्षा कमी वेळ अंघोळ करा. अंघोळीनंतर त्वचेवर हलके मॉयस्चरायझर लावावे.

- Advertisement -

* सारखे-सारखे लावावे मॉयश्चरायझर
चांगल्या क्वालिटीचे मॉयश्चरायझिंग क्रीम अथवा लोशन लावल्याने मॉयश्चर त्वचेमध्ये राहण्यास मदत होते. जर तुमची त्वचा खूप जास्त प्रमाणात कोरडी पडली असेल तर, तुम्ही मॉयश्चरायझिंग ऑईलदेखील लावू शकता. जसे बदामाचे अथवा ऑलिव्ह ऑईल. तुम्ही बदामाचे तेल त्वचेवर लावू शकता. अथवा अंघोळीच्या पाण्यामध्ये एखाद दोन थेंब टाकू शकता.

* हलके क्लिंजर वापरा
क्लिंजरमध्ये अनेक हार्श केमिकल्स असतात. या केमिकल्समुळे त्वचा कोरडी पडून त्याला खाज येण्यास सुरूवात होते. यामुळे अनेकवेळा रॅश येण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे शक्यतो नॅच्युरल अथवा माइल्ड क्लिंजरचा वापर करा. यामुळे त्वचेचा मऊपणा कायम राहण्यास मदत होईल.

- Advertisement -

* हवेत ओलावा आणा
घर अथवा ऑफिसमधील कोरड्या हवेमुळे तुमच्या त्वचेचा मऊपणा कमी होण्याची भिती असते. यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये ह्यूमिडिफायर लावल्यास फायदा होईल. यामुळे हवेमध्ये ओलावा राहण्यास मदत होईल आणि तुमच्या त्वचेचा मऊपणा राहण्यास मदत होईल.

* मऊ कपडे घाला
त्वच्या कोरडी पडल्याने आग होण्यास सुरूवात होते. त्यासाठी मऊ कपडे घालण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही कॉटन, सिल्क यापासून तयार करण्यात आलेल्या कपड्यांचा वापर करू शकता. त्वचेला नुकसान पोहचवणार्‍या डिटर्जंडचा वापर कपडे धुण्यासाठी टाळा. यामुळेदेखील त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते.

* त्वचा घासून साफ करू नये
काही जणांना त्वचा घासून स्वच्छ करण्याची सवय असते. असे करणे टाळा. असे केल्याने तुमच्या त्वचेला नुकसान होण्याची भिती असते. तसेच त्वचा कोरडी पडल्याने आग आणि खाज येऊ शकते.

* भरपूर पाणी प्या
थंडीमध्ये अनेकजण पाणी कमी प्रमाणात पितात. यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. तसेच त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचेमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची सवय लावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -