घरलाईफस्टाईलआरोग्यदायी थंडी !

आरोग्यदायी थंडी !

Subscribe

हिवाळ्यात भरणारी थंडीची हुडहुडी ही सगळ्यांनाच हवी-हवीशी वाटते. या थंडीच्या दिवसात बरेच जण अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊन गुलाबी थंडीचा आस्वाद आपल्या मित्रपरिवार, कुटुंबासोबत घेत असतात. ही कडाक्याची थंडी, गुलाबी थंडी औषधी असतेच तसेच ती आरोग्यासाठी फायदेशीर देखील मानली जाते.

थंडीच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात जेवढे जाल तेवढा त्याचा फायदा होतो, म्हणूनच सर्व जण व्यायामाकडे वळताना दिसतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात निवांतपणा फार कमी दिसतो. या ऋतूतील थंड, अल्हाददायक शुद्ध हवा शहरात मिळणे कठीणच. या शुद्ध हवेसाठी प्रदूषित शहरांपासून जितके दूर जाल तितकी नैसर्गिक शुद्ध हवा आरोग्यास लाभदायक ठरेल. या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात व्यायाम करणं, फिरायला जाणे, जॉगिंग केल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरून पचनसंस्था उत्तम राहण्यास मदत होते. अशा प्रकारे निसर्गाच्या साथीने भरपूर व्यायाम केल्यास हे थंडीचे दिवस आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचे असतात.

*पहाटे गवतावर चालल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.

- Advertisement -

*मानसिक ताण-तणाव दूर होण्यास मदत होते.

*मधुमेह असणार्‍या व्यक्तींनी या थंडीच्या दिवसात पहाटे फिरायला गेल्यास अनेक फायदे शरीरास मिळतात.

- Advertisement -

*पहाटे दवबिंदू पडलेल्या गवतावर चालल्यास शरीरातील उष्णता, गरमी, त्वचेतील दाह कमी होते.तसेच, रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली राहते.

*थंडीच्या दिवसात गवतावरील दवांवर चालल्याने संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालते.

या आरोग्यदायी थंडीचा विशेष फायदा म्हणजे आजारपण कमी होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांत गरम आणि थंड अशा दोन्ही पाण्यांनी आलटूनपालटून आंघोळ केली तरीदेखील शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरात असणार्‍या पेशी दवबिंदूच्या स्पर्शाने कार्यरत होतात. त्यामुळे साधारण नेहमीच होणारे संसर्गजन्य आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे हिवाळ्यात शक्यतो दवबिंदूंवरून चालण्याचा व्यायाम आरोग्यास नक्कीच हिताचा ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -