घरलाईफस्टाईल'या' पदार्थांचे सेवन करुन शरीर ठेवा उष्ण

‘या’ पदार्थांचे सेवन करुन शरीर ठेवा उष्ण

Subscribe

हिवाळ्यात खाण्या-पिण्याची चंघळ असते. या दिवसात गरमागरम खावेसे वाटते. मात्र, असे काही पदार्थ आहेत, ज्याचे सेवन केल्याने हिवाळ्यात तुमचे शरीर उष्ण राहण्यास मदत होते.

फळे

- Advertisement -

ऋतू कोणताही असो. फळे कोणत्याही ऋतूत खाणे आरोग्यासाठी उत्तमच मानली जातात. विशेष करुन हिवाळ्यात रसाळ फळे आवर्जून खावीत. हिवाळ्यात संत्री, द्राक्षे आणि लिंबू खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती अधिक बळकट होते. या फळांमधून व्हिटॅमिन सी देखील मिळते. त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून या फळांचे सेवन करावे.

वरण

- Advertisement -

हिवाळ्याच्या दिवसात गरमागरम वरणाचे सेवन करावे. दररोजच्या आहारात डाळीचा समावेश केल्यास शरीरास आवश्यक पोषक घटक मिळतात.

अंडी

हिवाळ्यात दररोज अंडी खावीत. अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी १२, बी ६, के ही उत्तम स्त्रोत आहेत. यामध्ये कॅल्शियम , लोह, पोटॅशियम, सेलेनियम, फॅटी acid आणि प्रथिने असतात.

बटाटे

हिवाळ्यात बटाटे खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. बटाट्यात व्हिटॅमिन बी६, सी, फोलेट आणि फायबर असतात.

सुकामेवा

सुकामेवा खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. विशेष करुन हिवाळ्यात सुकेमेवा खाणे आवश्यक असते. यामध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, ओमेगा ३ एस, मॅग्नेशियम आणि निरोगी प्रथिने आढळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -