‘हे’ करा रक्तदाब टाळा

ज्या व्यक्तींना रक्तदाब आहे अशा व्यक्तींने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करणे तर काही गोष्टी टाळणे गरजेचे असते. त्या कोणत्या गोष्टी आहेत. ते जाणून घेणार आहोत.

Mumbai
risk factor high blood pressure
उच्च रक्तदाब

योग्य आहार घ्यावा 

रक्तदाब नीट राहावा आणि ह्रदयावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ, चरबी विरहीत उत्पादने आपल्या रोजच्या आहारात वापरावीत. मीठ आणि साखरेचा आपल्या आहारातील अधिक वापर टाळावा. तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी मीठाचे सेवन कमी करावे.

पाण्याचे सेवन करावे

दररोज भरपूर पाणी पिणे हे केव्हाही चांगले. त्यामुळे दिवसाला ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन करावे.

लसणाचे सेवन करावे

लसूण खाल्ल्यास कोलेस्टरॉल आणि रक्तदाबाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे लसणाचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

वजनावर नियंत्रण ठेवा

तुमच्या उंचीनुसार वजन नियंत्रणात ठेवा. जसजसे तुमचे वजन वाढते, त्याप्रमाणे तुमचा रक्तदाबदेखील वाढतो. वजन घटवून तुम्ही रक्तदाबाच्या त्रासापासून दूर राहू शकता.

शारीरिक हालचाल करा

तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी शारीरिक हालचाली करत राहणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे वजनदेखील नियंत्रणात राहू शकते. तुमच्या ह्रदयावर येणारा दबाव आणि तणाव यामुळे कमी होण्यास मदत होते. रोज किमान अर्धा तास चालणे आवश्यक असून सायकलिंग, धावणे, नृत्य हेदेखील तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.

तंबाखू सेवन टाळा

उच्च रक्तदाबासाठी धुम्रपान करणे हा सर्वात मोठा धोका आहे. तुम्ही सिगारेटचे जितके झुरके ओढाल तितका तुमचा रक्तदाब अधिक वाढत जातो. ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराला धोका उद्भवतो. त्यामुळे तंबाखूचे कोणत्याही प्रकारचे सेवन टाळणे योग्य.

दारू पिणे टाळा

दारूचे अतिसेवन हे उच्च रक्तदाबाला कारणीभूत ठरते. एका वेळी तीनपेक्षा अधिक ग्लास दारू पिणे हे उच्च रक्तदाबाला आमंत्रण देते. उच्च रक्तदाब असल्यास, दारू पिणे टाळा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here