‘या’ कुकिंग टीप्स स्वयंपाकमध्ये फार उपयुक्त ठरतील

स्वयंपाक घरातील खास टीप्स

Mumbai
kitchen tips in marathi
गृहिणींसाठी खास किचन टिप्स

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

बिर्याणी अधिक स्वादिष्ट बनवायची असल्यास त्यात जास्त कांदा टाका आणि कांद्याला थोड्या टोमॅटोसोबत तेलामध्ये जास्त वेळा परतवून घ्या. यामुळे बिर्याणी अधिक स्वादिष्ट बनण्यास मदत होते.

दूध उकळते वेळेस भांड्याच्या तळाला चिटकून राहते तर भांड्यामध्ये दूध टाकण्या अगोदर त्यात थोड पाणी टाकून दूध टाका. यामुळे दूध चिकटणार नाही.

पदार्थ बनवताना दडलेल्या मसाल्यांचा रंग आणि स्वाद राखून ठेवण्यासाठी मसाल्यांना कधी ही हळू वार आगीवर तळा.

कांदा कट करण्याच्या अगोदर त्याला सोलून दोन भागा मध्ये कापा आणि पाण्यामध्ये दहा मिनिटा साठी भिजवा अस केल्याने कांदा कापते वेळेस तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू येणार नाहीत.

कांदा भाजताना त्यात किंचीत मीठ घाला यामुळे कांदा लगेच भाजण्यास मदत होते.