पदार्थ रुचकर होण्यासाठी खास किचन टीप्स

पदार्थ रुचकर होण्यासाठी जाणून घ्या खास किचन टीप्स

Mumbai
Cooking-Tips
लॉकडाऊनमध्ये लोकांनी 'हे' पदार्थ केले सर्वाधिक सर्च

स्वयंपाक करताना अनेकदा गृहिणींना पदार्थ रुचकर होण्यासाठी काय करावे हे कळत नाही. मात्र पदार्थ रुचकर होण्यासाठी या खास किचन टीप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरण्यास मदत होईल. जाणून घेऊया अशा खास किचन टीप्स.

  • वाळलेल्या मिरचीच्या बिया , उन्हाळ्यात पापड करताना वापराव्यात. यामुळे पापडाला एक वेगळीच चव येते.
  • वरणाला वेगळी चव येण्यासाठी वाळलेल्या मिरचीच्या बिया मोहरीसोबत फोडणीत वापराव्यात. यामुळे वरणाला एक वेगळी चव येते आणि वरण खमंग होते.
  • ढोकळ्यासाठी डाळ तांदूळ भिजवताना त्यात पाव वाटी सोयाबिन भिजत घाला. यामुळे ढोकळा मऊ होण्यास मदत होते.
  • दहीवड्यासाठी उडीद डाळीबरोबर सोयाबीन भिजत घाला आणि वाटून घ्या. यामुळे वडा मऊ आणि नरम होतो.
  • फोडणी देताना तेल तापल्यावर प्रथम मेथीचे दाणे घालावेत आणि थोडे गुलाबी झाल्यावर इतर पदार्थ घालावेत, यामुळे छान खमंग येण्यास मदत होते.
  • खीर बनवत असल्यास तांदूळ शिजल्यावर त्यात चिमूटभर मीठ टाकावे, असे केल्याने साखर कमी लागेल आणि खीर चवदार बनते.
  • लवकर दही येण्यासाठी विरजन लावताना १ चमचा कॉर्न फ्लावर दुधात मिसळून दूधाचे विरजण लावावे. यामुळे दही लवकर तयार होते.