स्वीट कॉर्न खीर

Mumbai
Corn Basundi
स्वीट कॉर्न खीर

जेवणानंतर बऱ्याच जणांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. अशावेळी अनेक जण आईस्क्रीम खातात. मात्र, जर तुमच्या घरी स्वीट कॉर्न असतील तर तुम्ही त्याची थंडगार खीर ही तयार करु शकता. चला तर पाहुया स्वीट कॉर्न खीरची रेसिपी

साहित्य

दिड कप स्वीट कॉर्न
१ लिटर दूध
१ टिस्पून तूप
३/४ कप साखर
१ चिमटी केशर
१/४ टिस्पून वेलची पुड
६-७ बदाम, ६-७ पिस्ते

कृती

सर्वप्रथम स्वीट कॉर्न कुकरमध्ये ३ शिट्या करून शिजवून घ्यावे. नंतर उकडलेल्या कॉर्नपैकी थोडे कॉर्न बाजूला काढावे आणि बाकीचे मिक्सरमध्ये वाटावे. त्यानंतर दूध पातेल्यात आटवण्यास ठेवावे. साय धरली कि चमचा फिरवावा. दूध आटत असतानाच दुसऱ्या एका कढईत तूप गरम करून त्यात अख्खे कॉर्न आणि कॉर्नपेस्ट सुकेस्तोवर परतावी. किंचित गुलाबी होऊ द्यावी. दूध साधारण निम्मे होऊ द्यावे. त्यात परतलेली पेस्ट, साखर, केशर, बदाम-पिस्त्याचे काप, आणि वेलचीपूड घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे उकळवावे. खीर रूम टेम्परेचरला आली कि फ्रीजमध्ये ठेवावी. गार झाल्यावर सर्व्ह करावी.