‘कॉर्न चीझ बॉल’

खमंग 'कॉर्न चीझ बॉलची' पाककृती.

Mumbai
corn cheese ball recipe in marathi
कॉर्न चीझ बॉल

सध्या रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मस्त रंगदार पाऊस आणि त्यासोबत छान चमचमीतगरमागरम आणि खुशखुशीत काहीतरी खावेसे वाटतेअशावेळी जर गरमागरम कॉर्न चीझ बॉल आणि त्यसोबत वाफाळलेला चहातुमच्याही तोंडाला पाणी सुटेलनाचला तर पाहुया खमंग कॉर्न चीझ बॉल पाककृती.

साहित्य

१ मोठा बटाटा

३/४ कप मक्याचे दाणे

१/२ कप किसलेले चीझ

१/२ टीस्पून काळीमिरी

थोडा ओरेगॅनो

१/२ टीस्पून लसूण पेस्ट

४ चमचे मैदा

चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम एका कुकर मध्ये एक मोठा बटाटा आणि कॉर्न उकडून घ्या. उकडल्यावर बटाट्याची साल काढून बटाटा आणि कॉर्न एकत्र कुस्करून घेणे. त्यात किसलेले चीझ, काळीमिरी, थोडा ओरेगॅनो, १/२ छोटा चमचा लसूण पेस्ट एकजीव करा. चीझमध्ये मीठ असते त्यामुळे चिमूटभरच मीठ टाकावे. नंतर ४ चमचे मैदा टाकून सर्व सारण एकजीव करा आणि त्यांचे छोटे- छोटे बॉल तयार करा. त्यानंतर गॅसवर तेल गरम करुन ठेवावे. तेल चांगले गरम झाले की, त्यात हे बॉल मध्यम आचेवर तळा. आता हे बॉल टिश्शु पेपरवर काढून त्यातील अतिरिक्त तेल काढून टाका आणि हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here