ट्राय करा ‘यम्मी मका कटलेट’

भातात काही साहित्य मिसळवले की मका कटलेट पदार्थ तयार होतो. नक्की हा पदार्थ तयार करा

Mumbai

मक्याचे दाणे पौष्टिक असतात. मक्याचे दाणे भाजून, भाजीच्या स्वरूपात, उकडून खाऊ शकतो किंवा एखाद्या वेगळ्या पदार्थात, सलाडमध्येही घालू शकतो. याच मक्याच्या पासून एक यम्मी पदार्थ तयार करता येतो. अनेकदा आपल्याकडे रात्रीचा भात उरतोच. मग त्या भाताचे काय करावे, हा प्रश्न असतोच. याच भातात काही साहित्य मिसळवले की मका कटलेट पदार्थ तयार होतो. नक्की हा पदार्थ तयार करून पहा.

साहित्य 

उरलेला भात, उकडलेले मक्याचे दाणे, गरम मसाला, उकडलेला बटाटा, लिंबूरस, मीठ, साखर, ब्रेडचा चुरा आणि तेल.

कृती

भात थोडासा मऊ हवा. जर फडफडीत भात असेल तर तो थोडा मळून किंवा कुकरला परत थोडा शिजवून घ्या. मक्याचे दाणे, बटाटे, भात, लिंबूरस, मीठ, साखर आणि गरम मसाला एकत्र करून छान मळून घ्या. आता या मिश्रणाचे छोटे गोळे करा. ब्रेडच्या चुऱ्यामध्ये ते घोळवून तव्यावर लालसर रंगावर तळून किंवा भाजून घ्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here