घरलाईफस्टाईलमक्याचं पीठ करेल 'या' समस्या दूर

मक्याचं पीठ करेल ‘या’ समस्या दूर

Subscribe

ग्लूटन हा घटक नसल्याने मक्याच्या सेवनाने शरीराला डायबिटीज आणि हायपरटेंशन यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो

पावसाळ्यात सगळ्यांना हवाहवासा वाटणारा मक्का. फक्त पावसाळ्यात जरी खावासा वाटला तरी तो वर्षभर बाजारात सहज उपलब्ध होतो. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे मक्याचे पीठ म्हणजेच, कॉर्न फ्लोरही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. मक्याच्या पीठामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. यामध्ये ग्लूटन हा घटक नसल्याने याच्या सेवनाने शरीराला डायबिटीज आणि हायपरटेंशन यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो. याच मक्याच्या पीठाचे आरोग्यासाठी फायद्यांबाबत…

- Advertisement -

मक्याच्या पीठाचे आरोग्यदायी फायदे

वजनावर नियंत्रण

मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा मिळते. तसेच सतत भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करण्यापासून वाचता. यामुळे वजन वाढण्याची समस्या होत नाही.

- Advertisement -

हायपरटेन्शनपासून सुटका

दररोज मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळतं. ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या दूर होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

मक्याच्या पीठामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड मुबलक प्रमाणात असल्याने याचे सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. मक्याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते.

एनीमियापासून बचाव

मक्याच्या पीठामध्ये आयर्न असते. त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता भासत नाही

बद्धकोष्टाची समस्या

मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने शरीरामध्ये मुबलक प्रमाणात फायबर पोहोचत नाही. ज्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तरही सामान्य राहतो. त्यामुळे बद्धकोष्टाची समस्या दूर राहते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -