घरताज्या घडामोडीCoronaVirus: आल्याचे लोणचे खा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा

CoronaVirus: आल्याचे लोणचे खा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा

Subscribe

आयुर्वेदानुसार आल्याचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. सध्या जगभरात फैलावर झालेला कोरोना व्हायरस लोकांच्या जीवनाचा शत्रू बनला आहे. त्यामुळे या रोगाला रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे खूप महत्त्वाचे आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहितीनुसार, आल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे आज आपण आल्याचे लोणचे कसे करतात हे पाहणार आहोत.

साहित्य

आले २५० ग्रॅम, हिरवी मिरची १०० ग्रॅम, लिंबूचा रस, हिंग दीड छोटे चमचे, लाल मिरची पावडर एक छोटा चमचा, बडीशेप एक छोटा चमचा, राई एक छोटा चमचा, राईच तेल दोन छोटे चमचे आणि चवीनुसार मीठ

- Advertisement -

कृती

आल्याचे लोणचे करण्यासाठी प्रथम ते स्वच्छ धुवून त्यांचे लांब तुकडे कापा. त्यानंतर हे आल्याचे लांब तुकडे एका कापडावर सुकण्यासाठी ठेवा. त्यामुळे त्याच्यातील ओलावा दूर होईल. आता हिरव्या मिरच्या नीट धुवून ती मध्यभागी कापा. त्यानंतर कृतीमध्ये सांगितलेले मसाल्याचे पदार्थ एका ताटात काढून घेऊन मिक्स करा. नंतर त्यात आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरची टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा. मग यानंतर सर्व मिश्रणात लिंबुचा रस आणि तेल टाकून मिक्स करा. व्यवस्थित प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर एका सुकलेल्या काचेच्या बर्नीत ठेवून द्या, त्यानंतर २ दिवस हे आल्याचे लोकचे बर्नीत ठेवून द्या. अशाप्रकारे तयार होईल आल्याचे लोणचे. आल्याचे लोणचे तुम्ही तीन महिने खाऊ शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -