गुणकारी गुलाब

मोहक, नाजूक गुलाब त्याच्या सुवासामुळे आपले मन प्रसन्न करते.पण त्यासोबतच त्यातील आरोग्यदायी गुणधर्म निरोगी स्वास्थ्यासाठी फार उपयुक्त ठरते. म्हणूनच प्राचीन काळापासून भारतीय औषधांमध्ये गुलाबाचा वापर केला जातो. चला तर मग पाहुयात गुलाबाचे आरोग्यदायी फायदे.

Mumbai
Rose Petals

वजन घटवते

गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मेटॅबॉलिझम सुधारण्याची क्षमता असते. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता असते. गुलाबामुळे भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.

मूळव्याध

गुलाबातील थंडावा तसेच फायबर घटक मूळव्याधाची समस्या दूर करण्यास मदत करतात. तसेच शरीरातील विषारी घटक दूर करून नैसर्गिकरित्या पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. मूळव्याधीच्या समस्येदरम्यान होणारा रक्तस्त्राव, वेदना कमी होण्यास मदत होते.

ताण-तणाव कमी होतो

मरगळ आणि ताणामुळे निद्रानाश किंवा मनाची अस्वस्थता वाढणे अशा समस्या वाढतात. गुलाबाच्या पाकळ्या मनावरील मरगळ दूर करण्यास मदत करतात. प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा रोमँटिक पर्याय म्हणजे गुलाब !

अ‍ॅस्ट्रींजंट

गुलाबपाण्यामुळे त्वचेवर होणारी जळजळ तसेच तेलाचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच त्वचेचा पोत सुधारण्यास व मुलायम होण्यास मदत होते. त्यातील अ‍ॅन्टिऑक्सिडंट व अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटकांमुळे त्वचा मोकळी होते.

ओठांचे सौंदर्य खुलते

गुलाबामुळे ओठ मुलायम आणि चमकदार होतात. तसेच त्यातील एक्सफोलिएट गुणधर्मामुळे अधिक आकर्षक होतात.

पिंपल्सची समस्या कमी होते

पिंपल्सच्या त्रासातून नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळवण्यासाठी गुलाब मदत करते. उत्तम मॉईश्चरायझर असण्याबरोबरच त्याच्या पाकळ्यांमध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल घटक असल्याने पिंपल्सचे डाग कमी करण्यासही मदत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here