घरलाईफस्टाईलदह्याचे फेस पॅक

दह्याचे फेस पॅक

Subscribe

सुंदर चेहरा हवा असल्यास पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. असे काही फेसपॅक आहेत जे तुम्ही घरच्या घरी बनवून चेहऱ्याला ग्लो आणू शकता. चला तर जाणून घेऊया दह्याचे घरगुती फेसपॅक...

घरच्या घरी सुंदर आणि नितळ चेहरा हवा असल्यास दह्याचा वापर जरुर करावा. दह्यामध्ये असे काही गुणधर्म आहे. ज्यांनी तुमची त्वचा अधिक खुलून दिसेल. चला तर जाणून घेऊया दह्याचे सौंदर्यवर्धक फायदे…

  • चेहऱ्याची स्किन कोरडी झाली असल्यास दही एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये थोडेसे मध घालून त्याची पेस्ट तयार करा. हा तयार झालेला पॅक चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर धुऊन टाका. या फेसपॅकचा कोरड्या चेहऱ्यावर रामबाण उपायआहे.
  • चेहऱ्यावरील डाग सौंदर्याला बादा आणतात. हे डाग दूर करण्यासाठी दह्याचा वापर करावा. दह्यामध्ये थोडीशी मुलतानी माती मिक्स करा आणि ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्याला लावा. यामुळे डाग जाण्यास मदत होते.
    curd face pack
  • तुमची स्किन संवेदनशील असल्यास दह्यासोबत केळ्याचा वापर करावा. केळे कुसकरुन त्यामध्ये दही आणि थोडेसे पाणी मिक्स करुन हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्याला लावून २० मिनिटाने चेहरा धुऊन टाका.
  • चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी दह्यामध्ये थोडेसे लिंबाचे थेंब आणि मध टाकून एकजीव करुन घेणे. हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्याला लावून सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ पाणयाने धुऊन घ्या. यामुळे चेहऱ्याला एक वेगळाचा ग्लो येतो.
    curd face pack
  • चेहरा टॅन झाला असल्यास दह्यामध्ये थोडेस बेसन आणि ओट्स मिक्स करा. हा तयार झालेला पॅक फेसवर लावा. यामुळे टॅन झालेली स्किन दूर होण्यास मदत होऊन चेहरा उजळतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -