आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

Mumbai
Horoscope 33
राशी भविष्य

मेष :- तुमच्या मनाप्रमाणे घटना घडतील. उत्साह वाढेल. वरिष्ठांची मर्जी राखता येईल. गविर्ष्ठपणा करू नका.

वृषभ :- तुमची चेष्टा केल्याने तुम्हाला राग येऊ शकतो. संयम ठेवा. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.

मिथुन :- नोकरीत यश मिळेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत जिंकाल. धंद्यात जम बसेल.

कर्क :- घरातील कामे करून घेता येतील. गरज असलेली व्यक्ती तुमच्या सहवासात येईल. मौल्यवान वस्तु घ्याल.

सिंह :- थट्टा-मस्करी करतांना प्रसंगावधान ठेवा. धंद्यात वाढ करता येईल. चर्चा करता येईल. खर्च वाढेल.

कन्या :- धंद्यात जुना वाद नव्याने निर्माण होऊ शकतो. थोरा-मोठ्यांचा मदतीची जास्त अपेक्षा ठेऊ नका.

तूळ :- रेंगाळत राहिलेले काम आजच करून घ्या. मित्र-परिवारांची भेट होईल. धंद्यात आळस करू नका.

वृश्चिक :- मौज-मजेत खर्च कराल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. धंद्यात फायदा होईल.

धनु :- मान-प्रतिष्ठा मिळेल. आनंदी व्हाल. नव्या वस्तूमुळे खुष रहाल. नातलगांच्या सहवासात रहाल.

मकर :- अरेरावी करू नका. दुखापत संभवते, त्यामुळे काम करतांना सावधगिरी बाळगा. वाहन जपून चालवा.

कुंभ :- घरातील कामे करून घेता येतील. नातलगांच्या सहवासात रहाल. वाहन खरेदीचा विचार कराल.

मीन :- डोळ्यांची काळजी घ्या. आनंदाच्या भरात एखादी गोष्ट उघड कराल. धंद्यात लक्ष द्या. फायदा होईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here