घरलाईफस्टाईलचॉकलेट खा फीट रहा!

चॉकलेट खा फीट रहा!

Subscribe

चॉकलेट केवळ आवडी पुरतेच मर्यादित नसून आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.

चॉकलेट म्हटलं की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणाच्या ही तोंडाला पाणी सुटते. काही व्यक्तींना चॉकलेट खाण्याची दररोजची सवय देखील असते. मात्र, चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होणं, पोटात दुखणं अशा समस्या निर्माण होतात. याकरता काही व्यक्ती चॉकलेट खाणं टाळतात. परंतु चॉकलेट खाण्याचे काही आश्चर्यचकित करणारे फायदेही आहेत. चॉकलेट केवळ आवडी पुरतेच मर्यादित नसून आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते.

तणाव होतो दूर

डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो. चॉकलेटमध्ये वापरण्यात येणाऱ्या कोको पावडरमध्ये अँटिऑक्सिडंटस् असते. ते शरिराचे स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदत करते. त्यामुळे डार्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

- Advertisement -

कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत

दररोज चॉकलेट खाल्ल्याने शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे नेहमी चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते. हृद्यासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृद्यरोगाची शक्यता कमी होते.

मेंदुचे स्वास्थ

एका संशोधनानुसार रोज दोन कप हॉट चॉकलेट ड्रिंक प्यायल्याने मेंदु निरोगी राहतो आणि स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते. चॉकलेटमुळे मेंदुतील रक्तस्त्राव सुरळीत राहतो.

- Advertisement -

थकवा होतो दूर

चॉकलेट खाण्याने व्यक्तीचा मूड सुधारण्यास मदत होते. चॉकलेटमध्ये कोको पावडर असल्याने चॉकलेटच्या सेवनाने थकवा कमी होतो आणि मूड देखील छान राहतो.

एथिरोकस्क्लेरोसिस

एथिरोकस्क्लेरोसिस हा एक प्रकारचा आजार आहे. यामध्ये धमन्या अवरोधित होतात. या स्थितीत चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते.

तरुणी दिसण्यास मदत होते

चॉकलेटमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट असते. यामुळे त्वचेवर दिसणारे वाढत्या वयाची लक्षणे आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दररोज एक चॉकलेट खाल्यामुळे तरुण दिसण्यास मदत होते.

वजन घटते

कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार नियमितपणे चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार दररोज डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने वजन कमी होते. त्याचप्रमाणे चॉकलेटमधील कोको फ्लॅवनॉल वाढत्या वयासंबंधित आजारांना दूर ठेवतात. अमेरिकेच्या संशोधनानुसार, दररोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्याने मानसिक स्वास्थ चांगले राहते आणि स्मरणशक्तीही देखील वाढते.

ब्लड प्रेशर नियंत्रणात

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. मात्र ज्या व्यक्तींना अचानक ब्लड प्रेशर कमी होण्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी नेहमी आपल्या सोबत चॉकलेट ठेवणे गरजेचे असते. ब्लड प्रेशर कमी झाल्यास त्यावेळी लगेचच चॉकलेट खाल्ल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -