घरलाईफस्टाईलवर्कआऊटनंतर करू नका या गोष्टी

वर्कआऊटनंतर करू नका या गोष्टी

Subscribe

नियमित वर्कआऊट नाही केले तरी चालेल परंतु, वर्कआऊटनंतर या चुका कधीच करू नका. जर तुम्ही वर्क आऊट करत आहात आणि त्याचा काहीच परिणाम दिसत नसेल तर समजून घ्या की तुम्ही वर्कआऊटनंतर काही चुका करत आहात. चला तर मग पाहूया कोणत्या चुका वर्कआऊटनंतर करू नयेत.

मध्येच व्यायाम बंद करणे

वर्कआउट करताना शरीराच्या तापमानासोबतच रक्त संचार आणि हृदयाचे ठोके वाढतात. हे सामान्य होण्यासाठी थोडा वेळा लागतो. असे असताना वर्कआउट करताना मध्येच व्यायाम करणे सोडू नका. हळु हळु व्यायाम करत सामान्य स्थितीमध्ये या. व्यायामानंतर हळुहळु जॉगिंग करून शरिराला सामान्य स्थितीत आणता येते.

स्ट्रेच न करणे

वर्कआऊटनंतर स्ट्रेच केल्याने दुसर्‍या दिवशी मांसपेशींमध्ये कोणतीच समस्या येत नाही. पुढच्या दिवशी तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. जे लोक व्यायामानंतर स्ट्रेच करत नाहीत त्यांना अडचणी येऊ शकतात.

- Advertisement -

व्यायामानंतर न खाणे

वर्कआउट नंतर काही तरी खा, असे केल्याने पेशींमध्ये सुधारणा होते. यामुळे व्यायामानंतर प्रोटीनयुक्त स्नॅक्स नक्की खा. दही, ब्लूबेरी किंवा मूठभर सुकामेवा चांगला पर्याय आहे.

कपडे न बदलणे

व्यायाम केल्यानंतर लगेच कपडे न बदलने ही सुद्धा चुकीची सवय आहे. व्यायाम करताना घामामुळे कपडे ओले होतात, जर व्यायामानंतर ते लवकर काढले नाहीत तर यिस्ट संक्रमण होऊ शकते. यामुळे व्यायामानंतर लवकर कपडे बदला.

- Advertisement -

शॉवर न घेणे

वर्कआऊटनंतर शॉवर न घेणे किंवा आंघोळ न करणे ही एक समस्या बनू शकते. कारण व्यायामानंतर घाम वाळतो आणि यामुळे जीवाणू वाढतात, यामुळे शॉवर घेणे आवश्यक आहे.

अल्कोहोल सेवन करणे

तुम्ही सिनेमामध्ये पाहीले असेल की वर्कआऊटनंतर हीरो अल्कोहोल सेवन करतात. परंतु असे बिलकुल करू नका. व्यायामानंतर ड्रींकला आपले स्नॅक्स बनवू नका. वर्कआउट नंतर लगेच अल्कोहोल प्यायल्याने शरीर डीहायड्रेट होऊ शकते. यामुळे वर्कआऊटनंतर खूूप पाणी प्या.

कमी झोपणे

व्यायामासाठी भरपूर झोप आवश्यक असते. जर तुम्ही व्यायाम करत आहात तर कमीत-कमी 7-9 तास झोप घ्या. झोपल्यानंतर मांसपेश्याना मजबुती मिळते. झोपल्यामुळे तणावापासून दूर राहाता येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -