घरलाईफस्टाईलरिकाम्या पोटी 'हे' खाणे टाळा

रिकाम्या पोटी ‘हे’ खाणे टाळा

Subscribe

रिकाम्या पोटी हे पदार्थ खाल्ल्याने होतो त्रास.

सकाळ झाली का सुरुवात होते ती एका चहाच्या घोटाने. मात्र अनेकदा रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्रास देखील होतो. तर बऱ्याच जणांना सकाळी काय खावे आणि काय खाऊ नये हे कळत नाही आणि त्यामुळे त्रास होण्यास सुरुवात होते. असे खाण्याचे काही पदार्थ आहेत. जे रिकाम्या पोटी खाणे टाळणे गरजेचे असते. ते कोणते पदार्थ ते जाणून घेऊया.

चहा

सकाळी – सकाळी बऱ्याच व्यक्तींना चहा लागतो. मात्र चहाचे अतिसेवन हे आरोग्यासाठी अपायकारकच असते. पण रिकाम्या पोटी चहा कधीच प्यायचा नाही. कारण चहामध्ये एॅसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहाचे सेवन करु नये.

- Advertisement -

संत्रे

संत्र्यामध्ये ऑर्गेनिक अॅसिड असते. त्यामुळे शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढते. रिकाम्या पोटी संत्री खाल्ली तर पोटातील देखील अॅसिडटे प्रमाण आणखी वाढते. ते आरोग्यासाठी घातक ठरते.

केळ

भूक लागली का बऱ्याचवेळी केळी खाल्ली जातात. पण रिकाम्या पोटी पोटात केले गेले तर अॅसिडीटी वाढते. केळ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप असते. त्यामुळे पोटात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा समतोल बिघडतो. हा समतोल बिघडल्याने पोटात अॅसिडीटी होते.

- Advertisement -

रताळे

रिकाम्या पोटी रताळे खाणे शक्यतो टाळावे. कारण रताळ्यामध्ये टॅनिन आणि पॅक्टीन मोठ्या प्रमाणात असतात. रिकाम्या पोटी शरीरात ते गेल्यामुळे ते पचत नाही. यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.

दही

रिकाम्या पोटी दही खाऊ नये. कारण दह्यातील प्रोबायोटिक बॅक्टोरिया रिकाम्या पोटात अॅसिडची मात्रा वाढवतात आणि त्यामुळे पोटात हमखास जळजळ होते.


वाचा – चहा पिणारे लोकं क्रिएटीव्ह असतात; संशोधकांचा दावा

वाचा – बाजरीची सकस खिचडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -