पीसीओडीकडे दुर्लक्ष नको – भाग 1

‘पीसीओडी’ म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिज हा स्त्रिया आणि मुलींच्या मनात आधी काळजी आणि मग न्यूनगंड निर्माण करणारा आजार. जीवनशैलीतील बदलांमुळे या आजाराचा सामना करावा लागणार्‍या स्त्रियांचे प्रमाण वाढते आहे. नेमका काय आहे हा आजार, तो होऊच नये म्हणून काय करावे आणि झालाच तरी त्यावर उपचार करण्यापूर्वीच्या तपासण्या कोणत्या, हे पाहूया या लेखात-

Mumbai
PCOD

‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’ (पीसीओडी)या नावातच सारे काही आले. पॉली- अनेक, सिस्टीक- गाठी, ओव्हेरियन- अंडाशयाचा आजार. अर्थातच या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतातआणि त्यामुळे मुख्यत: हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो.

पीसीओडीची लक्षणं

♦पीसीओडीत आढळणारी लक्षणं सर्वाधिक मासिक पाळीशी निगडीत
♦मासिक पाळीतील अनियमितता प्रमुख लक्षण
♦पाळीदरम्यानचा स्त्राव कमी होऊन कालांतराने पाळी बंद होणे
♦अनियमित मासिक पाळीचा परिणाम म्हणजे येणारे वंध्यत्व
♦यात वजन अधिक वाढतं
♦चेहरा, हातापायांवर आणि पोटावर लव येणे
♦चेहर्‍यावर मुरुमं येणे
♦मानेवरची त्वचा जाडसर होऊन काळी दिसणे
♦केस गळण्याचं प्रमाण वाढतं
♦काही महिलांची मानसिकता ढासळते

पीसीओडी कारणे

♦अनुवंशिक
♦इन्सुलिन प्रतिरोधन
♦स्थूलत्व
♦अयोग्य जीवनशैली
♦चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव व ताणतणाव.
♦पीसीओडी / पीसीओएस निदान
♦सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
♦मनाने कोणतेही उपाय करू नयेत.
♦स्वत: संपूर्ण तपासणी (क्लिनिकल एक्झामिनेशन) डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी व रक्ताच्या तपासण्या करावयास सांगतील.

पीसीओडीसाठी करावयाच्या तपासण्या

सोनोग्राफी
ही एक अतिशय महत्त्वाची तपासणी आहे. यामध्ये अंडाशयाचे अगदी योग्य चित्र आपल्याला मिळते आणि पीसीओडी असल्यास त्याचे योग्य निदान होऊ शकते.

हॉर्मोन्स
आपल्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण ही दुसरी महत्त्वाची तपासणी आहे. यात साधारणपणे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन (एफएसएच), ल्युटेनायझिंग हार्मोन(एलएच), टेस्टॉस्टेरॉन, एन्टीम्युलेरियन हार्मोन (एएमएच) आणि डिहायड्रोएपिअँड्रोस्टेरॉनचे (डीएचइएएस) प्रमाण तपासून घेतले जाते. याबरोबर स्त्रीच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही तपासले जाते.

डॉ. गंधाली देवरुखकर, स्त्रीरोग विशेषतज्ज्ञ आणि प्रसुतीशास्त्रज्ञ, वोकहार्ट हॉस्पीटल मुंबई सेंट्रल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here