घरलाईफस्टाईलअ‍ॅरेंज मॅरेज करत असाल घाबरू नका!

अ‍ॅरेंज मॅरेज करत असाल घाबरू नका!

Subscribe

लग्न हा आपल्या हिंदू धर्मातील १६ वा संस्कार समजला जातो. त्यामुळे अनेक जण अरेंज मॅरेज करतात. तर काही जण लव्ह मॅरेजचा पर्याय निवडतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराविषयी आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. लव्ह मॅरेज करताना मुलांना भावी पत्नीला एकांतात प्रश्न विचारण्याची गरज पडत नाही. मात्र, तुम्ही अरेंज मॅरेज करता तेव्हा याला सामोरे जावे लागते. अरेंज मॅरेज करत असाल तर या गोष्टी नक्कीच विचारात घ्या.

विवाहाच्या अपेक्षा –
प्रत्येक मुलीला आवडते की तिच्या होणार्‍या पतीने तिच्याकडून लग्नाविषयी सल्ला घ्यावा. यामुळे तुम्हालासुद्धा कळेल की, मुलगी आपल्या लग्नाविषयी काय विचार करते.

अशी करा प्रश्नाची सुरुवात –
तुमच्याप्रमाणेच मुलगीसुद्धा घाबरलेली, गोंधळलेली आहे. तुम्ही तिला उलट-सुलट प्रश्न विचारून जास्त नाराज करू नका. सर्वप्रथम तिला तिचे नाव, आवडी-निवडीबद्दल विचारा. जर तुम्हाला वाटले की, मुलगी खूपच लाजाळू आहे तर आधी स्वतःविषयी सांगण्यास सुरुवात करा. मग हळुहळू तिला बोलते करा. तुम्हाला कळून जाईल की, मुलगी कशी आहे.

- Advertisement -

करिअर –
मुलींना त्यांच्या करिअरबद्दल विचारल्यास खूप चांगले वाटते. तिला आपल्या करिअरबद्दल जोडीदार सिरीयस असल्याचा आनंद होतो. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल सांगा. तसेच तिच्या करिअरबद्दलही विचारा. तिच्या इच्छा, ध्येय याबद्दल जास्तीत-जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

आवड –
मोकळ्या वेळेत तुला काय करायला आवडते? तुला कोणत्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवण्यास आवडते? तिचे फ्रेंड सर्कल याविषयी थोडे जाणून घ्या. यामुळे तुम्हाला समजेल की ती कशी आहे.

- Advertisement -

आई-वडिलांविषयी –
ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आई-वडिलांची काळजी करता त्याप्रमाणे मुलीलासुद्धा आपल्या आई-वडिलांची काळजी असते. मुलीची काळजी कमी करण्यासाठी तुम्ही तिला विचारू शकता की, लग्नानंतर तुझ्या आई-वडिलांकडे कोण लक्ष देईल किंवा भविष्यात त्यांच्याविषयी काय विचार केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -