घरलाईफस्टाईलशरीराच्या 'या' भागांना हात लावल्यास होते इन्फेक्शन!

शरीराच्या ‘या’ भागांना हात लावल्यास होते इन्फेक्शन!

Subscribe

आपल्या शरीरात ६ अशी महत्त्वपूर्ण अंग आहेत, ज्यांना हात लावल्यामुळं इन्फेक्शन होतं. या अंगांना हात लावल्यास, तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील, तर ही माहिती नक्कीच तुमच्याासाठी उपयोगी पडू शकते.

बऱ्याच लोकांना सतत उठता – बसता आपल्या नाक, कान, डोळ्यांत बोटं घालण्याची अथवा शरीरावर सतत खाजवत राहण्याची सवय असते. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या शरीरात ६ अशी महत्त्वपूर्ण अंग आहेत, ज्यांना हात लावल्यामुळं इन्फेक्शन होतं. या अंगांना हात लावल्यास, तुम्ही आजारी पडू शकता. जर तुम्हाला या गोष्टी माहीत नसतील, तर ही माहिती नक्कीच तुमच्याासाठी उपयोगी पडू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणती अंग आहेत, ज्यांना हात लावणं योग्य नाही.

डोळे चोळू नयेत

बरेच लोक डोळे सतत चोळत असतात. कधी दुखत असतील तर किंवा कधी तरी आळस आला म्हणूनही. डोळे हे सर्वात संवेदनशील अंग आहे आणि लगेच इन्फेक्शन होऊ शकतं. मात्र, डोळे चोळत असताना या गोष्टी लक्षात घेतल्या जात नाहीत. हात आणि नखांमध्ये सहज किटाणू जातात, त्यामुळं डोळ्यांना लगेच इन्फेक्शन होतं. त्यामुळंच डोळ्यांना खाज येण्यासारखे प्रकार होऊन याचं रुपांतर इन्फेक्शनमध्ये होतं.

- Advertisement -

यामुळं होतात मुरुमं

रोज आपला चेहरा धुण्याची सर्वांनाच सवय असते. आंघोळ झाल्यानंतरही आपण आपला चेहरा नीट तर दिसतो ना याबाबत सतर्क असतो आणि सतत चेहऱ्याला हात लावत असतो. चेहऱ्यावर जर तेल उतरत असेल वा तुम्ही चेहऱ्याला सतत हात लावत असाल तर ते अतिशय वाईट आहे. यामुळंच चेहऱ्यावर मुरुमं येतात. सतत हात लावल्यामुळं किटाणू चेहऱ्याला लागून इन्फेक्शन होण्याचा संभव असतो. त्वचेलादेखील त्रास होत असल्यामुळं सावधानता बाळगणं गरजेचं आहे.

कानामध्ये बोटं घालू नका

लोकांना खाज आल्यानंतर कानात बोटं घालायची सवय असते. कानात बोट घालून कान साफ करण्याचादेखील काही लोक प्रयत्न करतात. तर काही लोक हाताला येईल ती गोष्ट कानात घालून साफ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे अतिशय धोकादायक आहे. यामुळं कानाच्या पडद्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते आणि कान निकामी होण्याचा धोकादेखील असतो.

- Advertisement -

नाकात बोट घालू नका

बरेच लोक कानाप्रमाणंच नाकातदेखील बोट घालून साफ करतात. मात्र नाकातील घाण काढण्याऐवजी ते नव्या आजाराला आमंत्रण देत आहेत, याचा जरादेखील विचार केला जात नाही. हातातील किटाणू नाकामध्ये जाऊन नोजल इन्फेक्शन होतं आणि सतत असं केल्यास, फंगल इन्फेक्शनदेखील होऊ शकतं. सॅनिटाईज टिश्यू हा नाक साफ करण्याचा योग्य प्रकार आहे.

नखाची त्वचा

नखं कापताना बऱ्याचदा आतली त्वचा खराब झाल्याचं दिसतं. त्यावेळी आपल्या बोटानंच ती घाण काढण्याचा प्रयत्न केला जातो किंवा नेलकटरचा वापर केला जातो. मात्र यामुळं फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. त्यामुळं पाण्याचा वापर करावा.

तोंडात हात घालू नये

वास्तविक ही सवय फार कमी लोकांना असते. पण असे करणाऱ्या लोकांना आजारी पडण्याचा जास्त धोका असतो. तुम्ही हात कितीही स्वच्छ धुतलेले असले तरीही, बॅक्टेरिया त्वचेला चिकटलेले असतात. त्यामुळं तोंडात बॅक्टेरिया जाऊन आजारी होण्याची शक्यता असते.

गुदद्वार हात लावू नये

गुदद्वार हे शरीराचं असं अंग आहे, जिथं हात लावल्यास, आजार वाढतात. हा अतिशय संवेदनशील भाग असून बॅक्टेरिया होण्याची जास्त शक्यता असते. तर हात लावल्यास, हातावरदेखील बॅक्टेरिया जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. त्यामुळं इन्फेक्शन पसरण्याची भीती असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -