घरलाईफस्टाईलयामुळे येतात का पिंपल्स? लगेचच हे पदार्थ खाणे टाळा

यामुळे येतात का पिंपल्स? लगेचच हे पदार्थ खाणे टाळा

Subscribe

चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाठी आपल्या रोजच्या खाण्यापिण्याची सवयही कारणीभूत आहे. आपल्या रोजच्या खाण्यातल्या काही पदार्थांमुळेही आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

चेहऱ्यावर एकही डाग नसेल तर चेहरा खूप सुंदर दिसतो. पण चेहऱ्यावर पिंपल्स आले तर चेहरा चांगला वाटत नाही. आपला कॉन्फिडन्सही कमी होतो. पिंपल्समुळे आपल्याला त्रासही होतो. चेहऱ्यावर काळे डाग येतात. मग ते काळे डाग किंवा पिंपल्स कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पिंपल्स कमी करण्यासाठी अनेक महागडी औषधेही खाल्ली जातात. परंतु चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाठी आपल्या रोजच्या खाण्यापिण्याची सवयही कारणीभूत आहे. आपल्या रोजच्या खाण्यातल्या काही पदार्थांमुळेही आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. जाणून घेऊया कोणते पदार्थ आहेत ज्यांचा अतिसेवनामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

मैदायुक्त पदार्थ

- Advertisement -

रोजच्या खाण्यात जर मैद्याच्या पदार्थांचा जास्त समावेश असेल तर त्यांनेही चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरूवात होते. मैद्यापासून तयार झालेली बिस्किट,ब्रेड हे पदार्थ खाणे टाळा. मैद्यामुळे पोट साफ होण्यास अडचण येते. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम म्हणून चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

जंक फुड


मोठ्या प्रमाणात जंक फुडचे सेवन हे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे महत्त्वाचे कारण आहे. तेलकट पदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येतात. अनावश्यक तेल शरीरात गेल्याने त्याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स स्वरूपात होतात.

- Advertisement -

चहा कॉफीचे सेवन


जर सतत चहा कॉफी पिण्याची सवय असेल तर ती सवय त्वरित बदला. चहा,कॉफीचे अतिसेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचे कारण बनते. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे इंशुलिनचे प्रमाण वाढवते त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

औषधांचे सेवन


जास्त प्रमाणाच औषधांचे सेवन करत असाल तर त्यानेही चेहऱ्यावर पिंपल्स येतात. औषधांच्या सेवनाने शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. हार्मोन्सच्या असंतुलित असण्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यामुळे जास्त प्रमाणात औषधांचे सेवन करणे टाळा.


हेही वाचा – हिवाळ्यात उपशीपोटी खा ‘हे’ पदार्थ शरीराला होतील फायदे

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -