स्वप्नातील घर, बाप्पाच्या नगरीत !

गणपती देवस्थानामुळे टिटवाळ्याला महत्व आले आहे. टूमदार गाव असलेला हा भाग नागरीकरणामुळे शहरी होत चालला आहे. गेल्या अनेक वर्षांत टिटवाळ्याचा चित्र पालटून गेलय. मोठया मोठया गृहसंकुले उभी राहत आहेत. किफायतशीर किंमतीत घरं उपलब्ध होत असल्याने बाप्पाच्या नगरीत स्वप्नातील घरे घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे.

Mumbai
titwala project

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणजे टिटवाळा. मुंबई नाशिक आग्रा महामार्गापासून अवघ्या अर्धा तासावर असलेले हे गाव ! वाढत्या नागरीकरणामुळे शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रेल्वे अथवा वाहनाने मुंबईपासून साधारण एक ते दीड तासाच्या अंतरावर हे शहर असल्याने नागरिक टिटवाळा शहरात घरे घेण्यासा अलिकडे सर्वाधिक पसंती देत आहेत. वाढती वस्ती आणि त्यामुळे वाढत्या नागरी सुधारणा टिटवाळा परिसरात होत आहेत. रस्ते पाणी वीज रूग्णालय शाळा आदी सोयीसुविधा शहरात उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठमोठ्या विकासकांची पावले टिटवाळ्याकडे वळू लागली असून अनेक गृहप्रकल्प सुरू आहेत. टिटवाळ्यात येऊन महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणारा भाविक आता याठिकाणीच स्थायिक होऊ पाहत आहे.

गेल्या दहा बारा वर्षापूर्वी मुंबई परिसरातील नागरिक कल्याण-डोंबिवलीत व बदलापूरकडे वळू लागल्याने इथली वस्ती वाढली आहे. त्यामुळे अनेकजण आता टिटवाळ्याकडे घरे घेण्यास उत्सुक आहेत. टिटवाळ्याचा चेहरा दिवसेंदिवस बदलत चालला आहे. बाजूलाच खडवलीजवळ सैनिकी शाळा आहे. मोठ रूग्णालय आहे शिक्षणाच्या सोयी सुविधा आहेत. महाविद्यालये आजूबाजूच्या परिसरात आहेत. त्यामुळे मुंबई ठाण्याकडील नागरिक जागा शोधत टिटवाळ्याकडे येताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील अवघ्या दीड तासावर हे शहर असल्याने मुंबईतील नातेवाईकांना व कुटूंबातील व्यक्तींना भेटण्यासाठी झटकन जाता येते. आपले निवृत्तीचे जीवन आनंदात व निसर्गरम्य परिसरात घालवण्यासाठी अनेक मंडळी टिटवाळा परिसरात घर घेत आहेत.

मोठमोठे प्रोजेक्ट ..
टिटवाळ्यात मोठया प्रमाणात मोकळया जागेचा परिसर आहे या जागेत अनेक नामांकित बिल्डरांचे प्रकल्प सुरू आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या आल्हाददायी वातावरणात अत्याधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज भव्य गृहसंकुले उभारण्यास अनेक विकासक या परिसराला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकही येथील गृहसंकुलांना पसंती देत आहेत. केवळ मोकळी हवा आल्हाददायक वातावरण डोंगर आणि खाड्या यामुळे नागरिक या भागात राहावयास पंसती देत नाही तर या भागात शासन एमएमआरडीए आणि केडीएमसी यांच्यातर्फे विकासकामांचे कोट्यवधी रूपयांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. त्यामुळे येत्या सात, आठ वर्षांत या भागाचा आणखी कायापालट होणार आहे. कल्याण हे जंक्शन आहे कल्याण-टिटवाळा परिसरातून रेल्वेने मुंबईला जाणे लोकलच्या वाढत्या फेर्‍यांमुळे सहज शक्य झाले आहे.

यासगळया सुविधा नागरिकांना येथील गृहप्रकल्पांमध्ये भुरळ घालत आहे. सर्वांगाने विकसीत होणारे टिटवाळा हे उपनगर नागरी सुविधांचा आधार घेत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. टिटवाळा पूर्वेत रेल्वे स्टेशनपासून दोन मिनीटे अंतरावरच रिजन्सी ग्रुपचा रिजन्सी सर्वम हा प्रोजेक्ट 68 एकरवर वसला आहे. सर्व सोयी सुविधा युक्त असा हा प्रोजेक्ट साकारला जात आहे. जॉगिंग ट्रक, इंडोअर गेम, स्वीमिंग, बास्केट बॉल कोर्ट, टेनिस कोर्ट क्रिकेट ग्राऊंड अशा सर्व सुविधा आहेत. असे मोठ मोठे प्रोजेक्ट टिटवाळ्यात साकारले जात आहे. याशिवाय अनेक गृहसंकुले उभी राहत आहेत.

ऐतिहासिक महत्व …
टिटवाळा म्हटले की समोर उभी राहते ती श्री महागणपतीची भव्य मूर्ती. तेथील ऐतिहासिक महत्व. श्री गणेश मंदिर संस्थानाने भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा मंदिर परिसरात उपलब्ध करून दिल्या आहेत. दर्शन मंडप सभा मंडप बाजूला प्रशस्त तलाव भोवती बसण्यासाठी उद्यान मोकळी जागा मन प्रसन्न करते. टिटवाळ्याच्या विकासात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून मंदिर संस्थानतर्फे विकासाच्या प्रक्रियेत अग्रभागी असलेल्या संस्थांना आर्थिक सहकार्य केले जाते. त्यामुळे टिटवाळ्याचा चेहरा दिवसेंदिवस बदलत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here