घरलाईफस्टाईलगरम पाण्याचे अतिसेवन आरोग्यास अपायकारक

गरम पाण्याचे अतिसेवन आरोग्यास अपायकारक

Subscribe

कोरोनाच्या काळातही लोकांनी कधीही प्यायले नसतील तेवढे गरम पाणी प्यायले.

आपल्याकडे गरम पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले समजले जाते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आपल्याला सर्वात जास्त मदत करते. डॉक्टर आपल्याला नेहमी ३-४ लीटर पाणी दररोज प्यायचा सल्ला देतात. कोरोनाच्या काळातही लोकांनी कधीही प्यायले नसतील तेवढे गरम पाणी प्यायले. गरम पाणी पिणे शरीरातील आजार दूर होण्यास मोठी मदत होते. गरम पाणी प्यायल्याने आपल्याला जितके फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे तोटेही आहेत. जास्त प्रमाणात गरम पाण्याचे सेवन केल्यास आपल्या शरीरासाठी ते हानिकारक ठरू शकते. पाहूयात अतिरिक्त गरम पाणी प्यायल्याचे दुष्परिणाम.

अतिरिक्त गरम पाणी प्यायल्यास त्याच्या आपल्या किडणीवर सर्वात जास्त परिणाम होतो. किडणीत एक विशिष्ट कॅपिलरी सिस्टम असते. जी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टॉक्सिन्स शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत करते. गरम पाणी प्यायल्याने आपल्या किडणीवर जास्त जोर पडतो. त्यामुळे अति प्रमाणात गरम पाणी पिऊ नका.

- Advertisement -

जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या आतील अवयवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जास्त गरम पाणी प्यायल्याने तोडांच्या आतील बाजूस फोड येतात किंवा जळजळ व्हायला सुरूवात होते. त्यामुळे अतिरिक्त गरम पाणी शक्यतो टाळा. कोमट पाणी पिणे कधीही योग्य.

- Advertisement -

काही जणांना पहिल्यापासून गरम पाणी पिण्याची सवय असते. गरम पाणी प्यायल्याने सर्दी, खोकल्यासारखे आजार दूर होतात. त्याचप्रमाणे बॉडी डिटॉक्स होण्यासही मोठी मदत होते. शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्यास गरम पाण्याची मोठी मदत होते. परंतु हे गरम पाणी पिण्याचे काही योग्य प्रमाण असणेही गरजेचे आहे.


हेही वाचा – Makar Sankranti 2021: म्हणून मकर संक्रांतीला घालतात काळ्या रंगाचे कपडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -