घरलाईफस्टाईलदुधी भोपळ्याचे सूप

दुधी भोपळ्याचे सूप

Subscribe

हिवाळ्यात अनेकांना गरमागरम खावेसे वाटत असते. अशावेळी बरेच जण गरमागरम सूप घेतात. आतापर्यंत आपण टोमॅटो आणि इतर विविध सूप ट्राय केली आहेत. आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळ्याचे सूप कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • १ दुधी भोपळा
  • एक कांदा
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • आले
  • चवीनुसार मीठ
  • मिरी
  • लवंग
  • दालचिनी
  • तूप
  • जिरे
  • बटर

कृती

सर्वप्रथम दुधीचे बारीक तुकडे करुन घ्यावे. त्यानंतर कांदा, आले, मिरची, लसूण सर्व साहित्य बारीक करुन घ्यावे. हे सर्व साहित्य एकत्र करुन त्याला चांगल्या लावून घ्याव्या. पाणी घालू नये. नंतर मिश्रण मिक्सरवर फिरवून घावे. त्यानंतर कढईत तूप घालून गरम करून, जिरे, हिंग, मिरी, लवंग, दालचिनी हे घाऊन परतून घ्यावे. मग त्यात तयार ग्रेव्ही घालून गरज वाटल्यास थोडेसे गरम पाणी घालून मीठ घालावे. नंतर बटर किंवा लोणी घालून गरमागरम सर्व करावे. चवीसाठी वरून थोडी मिरपूड घालावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -