दुधीचे थालिपीठ

Dudhi Thalipeeth Recipe

दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. पण, तुम्ही दुधीचे थालिपीठ नाश्त्याला करून तुम्ही हेल्दी नाश्ता बनवू शकता. शिवाय हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो. त्यासाठी तुम्हाला जास्त त्रास घ्यायची गरज भासत नाही.

साहित्य

  • किसलेला दुधी
  • ठेचलेली मिरची
  • जिरे
  • तांदूळ पीठ
  • बटर
  • ठेचलेली लसूण आणि आलं पेस्ट
  • चवीपुरते मीठ

कृती

किसलेल्या दुधीमधून पाणी काढून घ्या. त्यानंतर तांदूळ पीठ, मीठ, जिरे, मिरची, आलं, लसूण पेस्ट मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्या. त्यावर तेल लावून नीट पीठ तयार करा. त्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर गोळे बनवून थालिपीठीप्रमाणे थापा. तव्यावर बटर सोडून थालिपीठ भाजा. तुम्हाला हवं असल्यास, बटरच्या जागी तेलाचाही वापर करता येऊ शकतो, यामुळे चव अधिक चांगली लागते.