घरताज्या घडामोडीलॉकडाऊन काळात प्रत्येकाकडे हव्यात 'या' ५ प्रकारच्या विमा पॉलिसी

लॉकडाऊन काळात प्रत्येकाकडे हव्यात ‘या’ ५ प्रकारच्या विमा पॉलिसी

Subscribe

लॉकडाऊन काळात प्रत्येकाकडे विमा पॉलिसी असणे फार महत्त्वाचे आहे.

जगभर कोरोना व्हायरसने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा औषध आलेले नाही. त्यामुळे सर्वांच्याच मनात या व्हायरसची भीती असून याची कधी कोणाला लागण होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या कुटुंबाकरता लवकरात लवकर पाच प्रकारच्या विमा पॉलिसी घेणे फार गरजेचे आहे.

यासाठी घ्यावी पॉलिसी

- Advertisement -

कोरोना विषाणूवर औषध आणि लस येण्यासाठी अनेक दिवस लागणार आहेत. मात्र, सध्या तरी या व्हायरसची लागण झालेल्यांवर उपचार करणे फार खर्चीक आहे. त्यामुळे लोकांना या दरम्यान पॉलिस असल्यास त्याचा अधिक फायदा होण्यास मदत होईल. यामुळे अनेक जण पॉलिसी घेत आहेत.

ही खरेदी करा पॉलिसी

- Advertisement -

कर आणि गुंतवणूक सल्लागार जीतेंद्र सोलंकी यांच्या माहितीनुसार; लोकांना सर्वात आधी स्वास्थ, जीवन आणि दिव्यांग या पॉलिसी खरेदी करणे गरजेचे आहे. आयुष्याकरता टर्म पॉलिसी, दिव्यांगांकरता अपघात विमा पॉलिसी आणि याशिवाय घराच्या संरक्षणासाठी होम विमा घ्यावा. यामुळे लोकांना आर्थिक मदत होईल. तसेच सर्वप्रथम लोकांनी आपला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी पॉलिसी घेतल्यानंतर म्युच्युअल फंड आणि इतर योजनांमध्ये गुंतवणूक करावी.


हेही वाचा – डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील १० कर्मचार्‍यांना करोना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -