घरगणपती उत्सव बातम्यागणपती विशेष : 'दुर्वामृत' पेय

गणपती विशेष : ‘दुर्वामृत’ पेय

Subscribe

बाप्पा म्हटलं का त्याचे आवडते मोदक हे आलेच. त्यासोबत बाप्पाचे प्रिय जास्वंद फूल आणि त्याच्या डोक्यावर वाहणाऱ्या दुर्वा ही आल्याच. मात्र, दुर्वा वाहण्याची आख्यायिका असली तरी दुर्वा हे आरोग्यासाठी एक उत्तम औषध आहे. पण, बरेच जण दुर्वाच्या रसाचे सेवन करत नाही. परंतु, हा दुर्वा तुमच्या पोटात जावा याकरता आज आम्ही तुम्हाला खास ‘दुर्वामृत’ पेय कसे बनवायेच ते दाखणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • दुर्वा २ वाटय़ा
  • पुदिन्याची पाने अर्धी वाटी
  • अर्ध्या लिंबाचा रस
  • मीठ २ चिमूट
  • साखर चिमूटभर

कृती

सर्वप्रथम २ वाट्या दुर्वा, अर्धी वाटी पुदिना, अर्धा लिंबाचा रस एकत्र करुन मिश्रण मिक्सरवर बारीक करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घाला. साखरेचे प्रमाण मात्र, मिठापेक्षा कमी ठेवा. नंतर हे मिश्रण गाळून फ्रीजमध्ये थंड करून प्यायला द्या. दुर्वामृत हे एक हटके पेय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -