घरलाईफस्टाईलबहुगुणी आपटा

बहुगुणी आपटा

Subscribe

आरोग्यदायी आपट्याच्या पानाचे महत्त्व.

आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले आणि झाडाची साल यांचा औषध म्हणून वापर केला जातो. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवतात. तर झाडापासून डिंकही मिळवला जातो. तर या पानांचा गुजरातमध्ये विडी बनविण्याकरिता उपयोग केला जातो. जुन्या काळात तोट्याच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत.

विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस दसरा म्हणून पाळला जातो. यादिवशी महाराष्ट्रात परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देत सीमोल्लंघन, शमीपूजन, सरस्वती पूजन, अपराजिता पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते. या दिवशी आपट्या पानाला अधिक महत्त्व असते. मात्र, ही आपट्याची पाने त्यादिवसापूर्तीच महत्त्वाची नसून त्याचा इतर आरोग्याच्या समस्या दूर होण्यास देखील फायदा होतो. चला तर जाणून घेऊया आरोग्यदायी आपट्याच्या पानाचे महत्त्व.

- Advertisement -

लघवीला जळजळ

लघवीच्या वेळी कळ, कंड, जळजळ होत असेल, तर आपट्याच्या पानांचा रस घ्यावा. आपट्याच्या पानांचा रस निघत नाही म्हणून पाणी घालून तो वाटून काढावा. हा रस २० ग्रॅम काढून त्या रसाइतकेच दूध आणि साखर घालावे. हे औषध दिवसातून वयोमानाप्रमाणे चार वेळा घ्यावे. यामुळे लघवी साफ होऊन सर्व विकार थांबतात.

गालगुंड

गालगुंड झाले असल्यास आपट्याच्या ४० ग्रॅम सालीचा अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा मंदाग्नीवर शिजवून घेऊन तो गार झाल्यावर त्यात मध घालून वयोमानाप्रमाणे सोसवेल एवढा प्यावा. गंड माळेवर आपट्याची साल बांधावी. गंडमाळा आणि गळ्याचे व्रण बरे होतात.

- Advertisement -

व्रणावर

व्रणावर आपट्याची साल बांधावी. ४० ग्रॅम आपट्याच्या सालीचा काढा गार झाल्यावर मध टाकून पोटात घ्यावा. त्यामुळे जीर्ण व्रण बरे होतात.

विंचू चावल्यास

विंचू चावला असेल तर त्या चावलेल्या जागेवरून आपट्याची शाखा खाली फिरवीत न्यावे. यामुळे विंचवाचे विष उतरते.

हृदयाची सूज

आपट्याच्या मुळाच्या सालीचा काथ हृदयाची सूज ओसरण्यास मदत करतो. मुळाची साल १० ग्रॅम दोन भांडी पाण्यात उकळावी. अर्धा भांडे बाकी राहिल्यावर मिश्रण उतरवावे. मग ते गाळून प्यावे.

पोटातील मुरडा बरा होण्यासाठी

मधाबरोबर आपट्याची सुक्‍या काळ्या फुलांचे चूर्ण १० ग्रॅम साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.

कृमीनाशक

आपट्याचे बीसुद्धा उपयुक्‍त आहे. बियांचे बारीक चूर्ण करून ते गाईच्या साजूक तूपात घोटून त्याचे मलम करावे जे जीवाणूंचे तसेच कीटक दंशस्थानी लावल्यास बरे वाटते.

लहान मुलांच्या पोटात कृमी झाल्यास

आपट्याच्या बीचे घृत पोटात घ्यावे. कृमी शौचावाटे बाहेर पडण्यास मदत होते. कृमिवर पण उपयोगी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -