घरलाईफस्टाईलघरच्या घरी 'फेशियल'

घरच्या घरी ‘फेशियल’

Subscribe

आपला चेहरा चमकदार होण्याकरता तरुणी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. मात्र हेच फेशिअल आपण घरातल्या वस्तू वापरुन देखील करु शकतो.

प्रत्येक व्यक्ती आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. तर काहीजण महागडे फेशिअल करुन आपला चेहरा खुलवतात. मात्र कालांतराने फेशिअलमुळे चेहरा खराब होण्याची देखील शक्यता असते. परंतु घरच्या घरी फेशिअल केल्याने चेहरा उजळण्यास मदत होऊन चेहऱ्यावर काही अपाय देखील होत नाही.

cleansing milk

- Advertisement -

स्टेप १ – क्लिजिंग

क्लिजिंग करण्यासाठी कच्चे दूध घेऊन कापसाने चेहरा पुसून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील धूळीचे कण दूर होऊन चेहरा स्वच्छ होतो. तसेच चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते.

scrubbing on face

- Advertisement -

स्टेप २ – स्क्रबिंग

स्क्रबिंग केल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन, ब्लॅक स्किन आणि व्हाईट स्किन दूर होते. स्क्रबिंग करण्यासाठी एक चमचा लिंबू रस, साखर आणि मध एकत्र करुन याची पेस्ट तयार करुन घेणे. हा पॅक अलगद हाताने चेहऱ्यावर लावून स्क्रब करावे.

steam for face

स्टेप ३ – स्टीमिंग

स्क्रब झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घेणे. त्यानंतर चेहऱ्याला स्टीमिंग करावे. याकता पाणी गरम करुन त्याची वाफ घ्यावी. यामुळे चेहऱ्यावरील ऑपन पोल्स क्लिन होऊ चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते.

face massage

स्टेप ४ – मसाज

एखादी क्रिम घेऊन त्यामध्ये बदामाचे किंवा ऑलिव्ह ऑइल घेऊन क्रिममध्ये मिसळावी. त्यानंतर त्या मिश्रणाने चेहऱ्याला १० ते २० मिनिटे मसाज करावा. त्यानंतर कॉटनचा कापड कोमट पाण्यामध्ये भिजवून त्याने चेहरा पुसून घ्यावा.

face pack

स्टेप ५ – फेसमास्क

गोल्ड फेशिअल करण्यासाठी हळद, दही, लिंबू रस, मध आणि एक चमचा खोबरेल तेल हे एकत्र करुन त्याचा फेसपॅक तयार करावा. हा फेसपॅक २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा.

Aloe-Vera apply on face

स्टेप ६ – मॉइस्चराइज

चेहरा धुऊन झाल्यानंतर चेहऱ्याला ताज्या कोरफडीचा गर काढून लावावा.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -